आरे कॉलनीमध्ये ९ जणांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद, वन विभागाच्या सापळ्यात अडकला बिबट्या

आरे कॉलनीमध्ये ९ जणांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद, वन विभागाच्या सापळ्यात अडकला बिबट्या

आरे कॉलनीमध्ये ९ जणांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद, वन विभागाच्या सापळ्यात अडकला बिबट्या

आरे कॉलनीतील (aarey colony leopard) नऊ जणांवर हल्ल्या करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर यश आले आहे. हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. यासाठी आरे परिसरात बिबट्यांचा वावर असणाऱ्या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. त्यातील युनिट क्रमांक ३१ येथील लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सांयकाळीच्या सुमारास एक बिबट्या अडकला आहे. या बिबट्याने ३१ ऑगस्टपासून आत्तापर्यंत ९ जणांवर हल्ला केला होता.

बुधवारी सांयकाळी पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या हा संशयित दहशत माजवणारा बिबट्या होता. त्यामुळे वन विभागाकडून त्याला ताब्यात घेत पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. दरम्यान वनविभागाकडून दहशत माजवणाऱ्या बिबट्यांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुच राहणार असल्याची माहिती प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये यांनी दिली आहे.

आरे कॉलनीमध्ये काही दिवसांपूर्वी एका ६४ वर्षीय महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. त्या घटनेला २४ तास उलटत नाही तोवर झाडावर लपून बसलेल्या बिबट्याने एका तरुणावर झडप घातली. सुदैवाने या बिबट्याच्या हल्ल्यातून दोघांचाही जीव वाचला आहे. मात्र वारंवार घडणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आरे कॉलनी परिसरात बिबट्यांचा वावर पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना सायंकाळच्या वेळेस घराबाहेर पडायचे की नाही अशी भीती वाटू लागली आहे. हल्लेखोर बिबट्याला पळवून लावण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात होती. मात्र वारंवार घडणाऱ्या घटनांनंतर वनविभागाची टीम या परिसरात दाखल झाली होती. हल्लेखोर बिबट्याला पळवून लावण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावले होते. अखेर या हल्लेखोर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.


 

First Published on: November 4, 2021 10:05 AM
Exit mobile version