माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे निधन

माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे निधन

माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार

राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार (वय ७६) यांचे शुक्रवार, १४ डिसेंबर रोजी सकाळी निधन झाले. अरुण बोंगीरवार हे १९६६ च्या आयएएसच्या बॅचचे अधिकारी होते. त्यांनी उस्मानाबाद, नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले होते. आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास त्यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सकाळी दहा ते साडे बाराच्या दरम्यान मंत्रालयाजवळील’मूनलाईट'(ओव्हल मैदानाच्या समोर) या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.

बोगींरवार यांच्या कार्यकाळ

औरंगाबाद, पुणे, कोकण येथे त्यांनी विभागीय आयुक्त म्हणून काम केले होते. महसुल विभागातील कामांच्या सुधारणांसाठी बोंगीरवार समिती अहवाल प्रसिद्ध आहे. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचे चेअरमन म्हणून काम करताना त्यांनी सर्वप्रथम खासगी कंपन्यांच्या सहभागातून तेथील टर्मिनलचे व्यवस्थापनाला सुरुवाती केली. आपल्या शासकीय सेवेच्या काही महिन्यांसाठी त्यांना १९९९ मध्ये मुख्य सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली. बोंगीरवार यांनी दोन वेगवेगळ्या सरकारच्या कार्यकाळात राज्याचे २५ वे मुख्य सचिव म्हणून काम केले. सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी या मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांनी प्रधान सचिव म्हणून काम केले.

माईक्रो वॉटर कन्झरवेशन प्रोजेक्ट

पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी पर्वती येथील झोपडपट्टी निर्मुलनाची मोठी योजना राबवली. पर्वती येथील झोपडपट्टीवासियांचे बिबवेवाडी येथील ओटा स्कीम येथे स्थलांतराची सर्वात मोठी योजना त्यांनी राबवली. ते राज्यात मॉडेल म्हणून गणले गेले होते. मात्र, त्यांच्या पश्चात जुन्या जागी पुन्हा झोपडपट्टी होणार नाही याची काळजी घेतली नाही. तसेच अनेकांनी नवी जागा दुसऱ्यांना विकून अथवा आपल्या मुलाबाळांना तेथे ठेवून जुन्याच झोपडपट्टीतील बस्थान सोडने नाही. त्यामुळे ती झोपडपट्टी तशीच राहिली. त्यांनी मराठवाडा आणि विदर्भाच्या दुष्काळाबाबत माईक्रो वॉटर कन्झरवेशन प्रोजेक्ट राबवला. त्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला. त्यांच्या पश्चात मुलगी दीप्ती, गार्गी आणि मुलगा पियुष असा परिवार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी हे त्यांचे जावई होत.

First Published on: December 14, 2018 9:30 AM
Exit mobile version