Money Laundering Case: मुंबई सत्र न्यायालयात अनिल देशमुखांचा जामीन अर्ज दाखल; बुधवारी सुनावणी

Money Laundering Case: मुंबई सत्र न्यायालयात अनिल देशमुखांचा जामीन अर्ज दाखल; बुधवारी सुनावणी

Money Laundering Case: मुंबई सत्र न्यायालयात अनिल देशमुखांचा जामीन अर्ज दाखल; बुधवारी सुनावणी

गेल्या अनेक दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख न्यायालयीने कोठडीत आहेत. १०० कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. सध्या अनिल देशमुखांना जामीन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज अनिल देशमुखांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. याप्रकरणी नुकतचे अनिल देशमुखांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

१०० कोटी वसूली प्रकरणात काही दिवसांपूर्वी तब्बल १२ तासांच्या ईडीच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना अटक करण्यात आली होती. गेल्या ६५ दिवसांपासून अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. ईडीने मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात सात हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र देशमुखांविरोधात दाखल केले आहे. याप्रकरणीत मुख्य सुत्रधार देशमुख असल्याचे ईडीने या आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच देशमुखांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि देशमुखांच्या पत्नीचा भाऊ सहआरोपी असल्याचे आरोपपत्रात दाखल करण्यात आले आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार जप्त करण्यात आली होती. यानंतर त्या गाडीचा मालक मनसुख हिरेनचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. पोलीस आयुक्तपदावरून हटवल्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या मेलमध्ये मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून १०० कोटींची वसुली करण्यासाठी अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांचा वापर करीत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या होत्या. सीबीआयने १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणाचा तपास केल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा ईडीनेही त्याच्याविरुद्ध तपास सुरू केला.


हेही वाचा – Nitesh Rane : नितेश राणेंना अटकेपासून दिलासा, 7 जानेवारीला अटकपूर्व जामीन अर्जावर होणार सुनावणी


 

First Published on: January 4, 2022 4:30 PM
Exit mobile version