माजी विरोधीपक्ष नेते प्रवीण छेडा भाजपात

माजी विरोधीपक्ष नेते प्रवीण छेडा भाजपात

माजी विरोधीपक्ष नेते प्रवीण छेडा

सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये आयआरामांचे प्रमाण वाढले असून, आज काँग्रेसचे पालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते प्रवीण छेडा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गरवारे क्लब येथे छेडा यांनी आपल्या हातात भाजपाचा झेंडा घेतला आहे. प्रवीण छेडा हे याआधी भाजपामध्ये होते मात्र प्रकाश मेहता आणि त्यांच्यातील अंतगत वादामुळे ते काँग्रेसमध्ये गेले होते मात्र आज स्थानिक पातळीवरील सर्व वाद मिटल्याचे सांगत आपण स्वगृही परतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान प्रवीण छेडा यांच्या येण्याने खासदार किरीट सोमय्या यांची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात असून, शिवसेनेचा सोमय्यांना विरोध आहे. त्यामुळे प्रवीण छेडा हे किरीट सोमय्या यांना लोकसभा निवडणुकीसाठी पर्याय असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भाजपने गुरुवारी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली मात्र त्यात ईशान्य मुंबईतील उमेदवार घोषित केला नाही. तसेच या जागी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या नावाची देखील चर्चा असल्याने ईशान्य मुंबईतुन सोमय्या, छेडा की किरीट सोमय्या अशी चर्चा रंगू लागली आहे.

भाजपा प्रवेशानंतर काय म्हणालेत छेडा 

आज सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा स्वगृही परतलो आहे. वनवास हा १४ वर्षाचा असतो पण सात वर्षात मला मुख्यमंत्र्यांनी पक्षात आणल्याचे सांगत मुंबईची उत्तर मुंबईची जागा मला काँग्रेस देत होते ती सोडून मी आज भाजपामध्ये आल्याचे छेडा यांनी सांगितले.

कोण आहेत प्रवीण छेडा

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत घाटकोपरमधून काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिलेले प्रवीण छेडा पराभूत झाले होते. सर्वात शभाजपच्या पराग शाह यांनी छेडा यांचा पराभव केला होता. तसेच प्रकाश मेहता यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे प्रवीण छेडा यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.

First Published on: March 22, 2019 3:15 PM
Exit mobile version