महाराष्ट्राचे चार वाघ आणि चार बिबटे पाठविले गुजरातला

महाराष्ट्राचे चार वाघ आणि चार बिबटे पाठविले गुजरातला

महाराष्ट्रातील वन्यजीव ही आता आपलं स्थान बदलत आहेत. हो तुम्ही बरोबर ऐकलंत. वन्यजीवांबाबत एक महत्वाची माहिती मिळतेय. गोरेवाडा प्रकल्पातील चार वाघ आणि चार बिबटे शनिवारी रात्री गुजरातला रवाना करण्यात आलेत. विशेष म्हणजे याबाबत दोन दिवस कुणालाच माहिती नव्हती. ही माहिती समोर आल्यानंतर याबाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

नेमके काय घडले?
काही दिवसाआधी गोरेवाडा प्रकल्पातून दोन वाघ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. रिपोर्टनुसार हे वाघ नेताना गुजरातमधील जामनगरमधील एका मोठ्या उद्योगपतीच्या खासगी प्राणिसंग्रहालयातील काही अधिकारी गोरेवाडा प्रकल्पात आले होते.त्यांनी गोरेवाडा प्रशासनाच्या रेस्क्यू सेंटरकडे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी नसताना जामनगर येथील पशुवैद्यकीय वाघ, बिबट्यांची मागणी केली होती. पण केंद्रीय प्राणिसंग्रहालयाची व अन्य विभागांची परवानगी नसल्याने त्यांनी वन्यप्राणी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर पुढच्या तीनच दिवसांत चिञ बदलले केंद्रीय प्राणिसंग्रहालयासह राज्य शासन, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या परवानग्या गोरेवाडा प्रशासनाला देण्यात आल्या. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने ज्यावर मान्यता दिली होती, त्याऐवजी नेता इतर वाघ नेण्यात आल्याची बोलले जात आहे.

अनेक उद्योग गुजरातला
फक्त वन्यजीवच नाही तर अनेक उद्योग गुजरातला गेले आहेत. त्यातील वेदांता-फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस (Vedanta-Foxconn and Tata Airbus) ही गुजरातला गेल्याने राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले होते. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले होते की गुजरातमध्ये जाणाऱ्या वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Chief Minister Eknath Shinde and Prime Minister Narendra Modi) यांच्यात चर्चा झाल्याचे व एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

 

First Published on: January 24, 2023 6:14 PM
Exit mobile version