आई बाजारात गेली असताना चार वर्षीय चिमुकल्याचा बादलीत पडून मृत्यू

आई बाजारात गेली असताना चार वर्षीय चिमुकल्याचा बादलीत पडून मृत्यू

मुंबईतील चार वर्षीय चिमुकल्याचा बादलीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिमुकल्याची आई त्याला आपल्या सासरे आणि भाचीकडे सोडून बाजारात गेली होती. पण जेव्हा ती परत आली तर तेव्हा चिमुकला बादलीत बुडलेला तिने पाहिला. त्यामुळे तातडीने चिमुकल्याला रुग्णालयात घेऊन गेले. परंतु चिमुकल्याचा जीव वाचवू शकले नाहीत.

मुंबईतील ही घटना चेंबुरमधील नालंदा नगर भागात घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी ही घटना घडली. चिमुकल्याची आई म्हणाली की, ती आपल्या बाळाला सासरे आणि भाचीसोबत घरात सोडून बाजारात गेली होती. जेव्हा ती बाजारातून परतली तेव्हा चार वर्षाच्या मुलगा देवांश घरात कुठेच दिसत नव्हता. तिने घरातल्या कानाकोपऱ्यात शोधले. शेवटी तो बाथरुममध्ये सापडला.

भरलेल्या बादलीत चिमुकला बुडला होता. त्याचे डोके बादलीच्या आतमध्ये होते आणि पाय बाहेर लटकले होते. या चिमुकल्याला तातडीने बादली बाहेर काढून सियोन रुग्णालयात नेले गेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मेडिकल रिपोर्टमध्ये पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे नोंद केले आहे. सध्या याप्रकरणाची तपासणी पोलीस करत आहेत.


हेही वाचा – कमी दरात चहा, पाववडा विक्रीच्या संशयातून तरुणाचा खून


 

First Published on: September 1, 2021 4:05 PM
Exit mobile version