मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात, दोघे जखमी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात, दोघे जखमी

मुंबई – मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाट येथे 9 वाहनांचा विचित्र अपघात झाला. ही घटना सोमावारी दुपारी घडली. भरधाव वेगाने आलेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने नऊ वाहनांचा अपघात झाला. या अपघातात दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर दुपारी 3 च्या सुमारास बोरघाटात विचित्र अपघात झाला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचा ढेकू गावाच्या हद्दीतील उतारावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला.  भरधाव ट्रकने पुढे जाणाऱ्या कारला जोरदार धढक दिली. त्यानंतर कारने एसटी बस आमि इतर सात वाहनांना धडक दिली. यात एसटी बसला जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. यावेळी मागून भरधाव आलेल्या वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने अपघातात सुमारे दहा वाहनांचे नुकसान झाले.

दोन प्रवाशी जखमी –

या अपघातात कारमधील दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. याबाबत माहिती अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आलेले गुरुनाथ साठीलकर यांनी दिली.

वाहतूक विस्कळीत –

अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ विस्कळीत झाली होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावरील आयआरबी, देवदूत यंत्रणांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

First Published on: September 13, 2022 10:06 AM
Exit mobile version