Corona : ठाणेकरांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्हिडीओ कॉलद्वारे मोफत तपासणी

Corona : ठाणेकरांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्हिडीओ कॉलद्वारे मोफत तपासणी

प्रातिनिधीक फोटो

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता ठाणे महापालिकेच्यावतीने आता शहरातील खासगी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांसाठी स्वतः च्या घरातून थेट व्हिडीओ कॉलद्वारे ऑनलाईन तपासणी आणि उपचार करण्याची सुविधा सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणारा अशा प्रकारचा भारतातील हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे.

डीजी ठाणे प्रणालीच्या माध्यमातून ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून www.touchbase.live या वेबसाईट वर जाऊन थेट व्हिडीओ कॉल करून नागरिक उपलब्ध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून घेऊ शकतात. नागरिक आपल्या फोन किंवा लॅपटॉप वरून डॉक्टरांशी संपर्क साधू शकतात. ठाण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून ही सेवा पूर्णत: मोफत असून इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ऑनलाईन उपक्रम राबवणारी ठाणे महापालिका हे देशातील पहिली महापालिका ठरली आहे.

३० जूनपर्यंत सेवा मोफत

सध्या कोविड १९ च्या संसर्गामुळे सर्व शासकीय तसेच महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या मनुष्यबळावर मोठा ताण आलेला आहे. या नवीन सुविधेमुळे घर बसल्या थेट खासगी क्षेत्रातील डॉक्टरांशी संवाद साधून उपचार करून घेता येणार आहे. सध्या या सुविधेतंर्गत सुमारे ४० डॉक्टर्स उपलब्ध झाले असून अजूनही सेवा देण्यासाठी डॉक्टर्स नोंदणी करीत आहेत. या सुविधेमुळे डॉक्टर्स पेशंटला स्क्रीनवर बघू शकतात, त्यांच्याशी संवाद साधू शकतात व कोणती औषधे घ्यायची आहेत यासाठी ऑनलाईन प्रिस्क्रिपशन देखील देऊ शकतात. या उपक्रमामुळे सद्यस्थितीत महत्त्वाचे ठरणारे सोशल सोशल डिस्टन्सिंग राखलं जाईल व रुग्णांबरोबरच डॉक्टरांचे आरोग्य देखील सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. फाइंड्याबिलिटी सायन्सेस या कंपनीने हि सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. ३० जूनपर्यंत ही सेवा मोफत असून सर्व नागरिकांची याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त डॉक्टरांनी देखील पुढे येऊन या वेब साईटवर नोंदणी करून दिवसातील किमान १-२ तास या सेवेसाठी द्यावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

कसा कराल वापर?


LockDown: घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींसाठी महिला आयोगाचा व्हॉट्सअॅप नंबर!
First Published on: April 10, 2020 11:37 PM
Exit mobile version