फोटो व्हायरल करण्याचे धमकावून केला बलात्कार; दोघांना अटक

फोटो व्हायरल करण्याचे धमकावून केला बलात्कार; दोघांना अटक

नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दोन नराधमांनी एका तरुणीवर सामुहिक बलात्कार केलाचा धक्कादायक प्रकार गोवंडी येथे घडल्याचे समोर आले आहे. अत्याचार करणाऱ्या दोघा नराधमांना ट्रॉम्बे पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. अमजदअली मोहम्मदजमा खान (३०) आणि नूर मोहम्मद नजीर शेख (४२) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेलेल्या माहितीनुसार; अमजदअली खान हा पेंटर असून शेख हा वाहन चालकाचे काम करतो. काही दिवसांपूर्वी अमजदअली खान यांनी तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून जवळीत निर्माण केली होती. तसेच त्यांनी तिचे नग्न फोटो मागवून घेतले होते. त्यानंतर तो तिला ते फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देवू लागला. तसेच तिला ६ सप्टेंबरला तिला मानखुर्दमधील महाराष्ट्र नगरातील शांती को – ऑपरेटिव्ह सोसायटीतील एका रुममध्ये बोलावून घेतले. त्यानुसार ती तरुणी त्या ठिकाणी गेली. त्यावेळी त्याठिकाणी खान आणि शेख उपस्थित होते. त्याठिकाणी ती एकटी आल्याची संधी साधत या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी अमजदअली मोहम्मदजमा खान आणि नूर मोहम्मद नजीर शेख या दोघांना अटक केली आहे.


हेही वाचा – सलमानच्या चित्रपटामध्ये काम देण्याचे आमिष दाखवत केली फसवणूक


 

First Published on: September 10, 2019 10:05 PM
Exit mobile version