ठाण्यातील स्कायवॉकवरून तरुणीने मारली उडी

ठाण्यातील स्कायवॉकवरून तरुणीने मारली उडी

ठाणे पूर्वेकडील कोपरी टीएमटी बस स्थानक येथील स्कायवॉकवरून तरुणीने उडी मारल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अंजली कश्यप (वय १९, रा. विरार) असे तरुणीचे नाव असून तिने स्कायवॉकवरून खाली उडी का मारली? याचा तपास कोपरी पोलीस करीत आहे. तिच्यावर कोपरीतील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. विरार येथे राहणारी अंजली बुधवारी ठाण्यातील लोकमान्य नगर येथे राहणाऱ्या मावशीकडे आली होती.

ठाण्यातील आर.जे. ठाकूर महाविद्यालयात तिची एमएच सीआयटीची परीक्षा होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेवण्यासाठी जाते, असे सांगून निघालेल्या अंजलीने सायंकाळच्या सुमारास कोपरीतील स्कायवॉकवरून स्वतःला झोकून दिले. यात पाठीवर पडल्याने तिच्या मणक्याला जबर मार लागला आहे. घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल करून पोलिस नियंत्रण कक्षाला खबर दिली. अधिक तपास कोपरी पोलीस करीत आहेत.

First Published on: February 5, 2020 10:27 PM
Exit mobile version