मुंबईतील तरुणीची दिल्लीत हत्या, 6 महिन्यांनंतर लागला तपास; वाचा नेमके प्रकरण काय?

मुंबईतील तरुणीची दिल्लीत हत्या, 6 महिन्यांनंतर लागला तपास; वाचा नेमके प्रकरण काय?

लग्नाचा दबावामुळे एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीची धारदार चाकूने हत्या करत शरीराचे तब्बल 35 तुकडे केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेला सहा महिने झाले असून, आता या घटनेचा तपास लागला आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा पोलीस आतापर्यंत तपास करत होते. अखेर पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आफताब अमीन पूनावाला (प्रियकर) असे हत्येकरूनचे नाव असून श्रद्धा वालकर असे त्याच्या प्रेयसीचे नाव आहे. श्रद्धा वालकर ही 26 वर्षांची होती. (girl murdered by live in partner case revealed after 5 months body cuts in several pieces)

सहा महिन्यांपूर्वी म्हणजे मे 2022मध्ये दिल्लीमध्ये एका तरुणीची हत्या झाली होती. हत्या झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावाला याला अटक केली.

नेमकी घटना काय?

आफताब अमीन पूनावाला नावाच्या व्यक्तीने कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या श्रद्धा वालकर या तरुणीला लग्नाच्या बहाण्याने मुंबईहून दिल्लीला नेले होते. त्यानंतर श्रद्धा वालकरने आफताब पूनवालाकडे लग्नाची मागणी केली. मात्र अफताब सातत्याने नकार देत होता. श्रद्धाने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. तेव्हा आफताबने तिची हत्या करून तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. त्यानंतर दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी ते तुकडे फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

वडिलांची पोलिसात तक्रार

श्रद्धा दिल्लीला गेल्यानंतर तिचे वडील विकास मदन वालकर (59) अधुनमधून तिच्या संपर्कात होते. परंतु, मे महिन्यापासून तिच्याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. त्यानंतर सातत्याने तिला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता. अखेर शंका आल्याने विकास वालकर यांनी थेट दिल्ली गाठली आणि तिला भेटण्याचा निर्णय घेतला.

श्रद्धा दिल्लीमधील छतरपूरच्या एका फ्लॅटमध्ये राहत होती. दिल्लीतील श्रद्धाचे हे ठिकाणा विकास यांना माहित होते. त्यानुसार, ते छतरपूरला गेले आणि बघितले तर, तिच्या घराला कुलूप होते. त्यानंतर त्यांना आजूबाजुच्यांकडे चौकशी केली असता, काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर विकास यांनी कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे दिल्लीतील मेहरौली पोलीस स्टेशनमध्ये आपल्या मुलीच्या अपहरणाचा एफआयआर दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तिचा तपास सुरूवात केली.

कालांतराने पोलिसांना या हत्येची तपास लागत गेला. पोलिसांनी टेक्निकल सर्विलांसच्या मदतीने आरोपी आफताबला शोधून काढले. त्यानंतर त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्यावेळी आरोपी आफताबने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि आफताब दिल्लीत एकत्र राहत होते. त्यानंतर काही दिवसांनी श्रद्धाने त्याच्या मागे लग्न करण्याचा तगादा लावला. त्यानंतर वैतागलेल्या आफताबने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. 18 मे रोजी आरोपी श्रद्धाची धारदार चाकूने हत्या केल्याचे आरोपी अफताबने सांगितले. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे लहान-लहान तुकडे केले. ते तुकडे दिल्लीतील वेगवेगळ्या परिसरांत टाकून दिले.

आरोपी आफताबच्या चौकशीनंतर पोलिसांनी काही अवशेष जंगलातून ताब्यात घेतले. सध्या आरोपी आफताब पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

पालघरमधील रहिवाशी

श्रद्धा आपल्या कुटुंबीयांसह पालघरमध्ये राहत होती. तसेच, श्रद्धा ही मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती. त्याठिकाणी श्रद्धाची आफताब अमीनशी भेट झाली. कालांतराने ते दोघे एकमेकांना पसंत करू लागले आणि ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. पण श्रद्धाच्या कुटुंबीयांना यासंदर्भातील माहिती मिळताच त्यांनी श्रद्धा आणि आफताबच्या नात्याला विरोध केला. कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे दोघांनीही मुंबई सोडून दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा – एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेतच ‘मोदी मोदी’च्या घोषणा

First Published on: November 14, 2022 4:38 PM
Exit mobile version