आजचा सोन्याचा भाव : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर

आजचा सोन्याचा भाव : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर

सोन्याचे दागिने

सोने आणि चांदी यांच्या दरातील चढ उतार हा सातत्याने सुरूच आहे. अनेक दिवसांनी पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या किंमतीत स्थिर किंमत पहायला मिळाली आहे. तुम्ही जर येणारा लग्नसराईचा हंगाम पाहता सोन्यात गुंतवणुक करण्यासाठी इच्छुक असाल तर हीच ती योग्य वेळ आहे सोने खरेदी करण्यासाठी. कारण कोरोनाच्या महामारीत सोन्याच्या दरांमध्ये जी तेजी आली होती, त्यामध्ये आता घसरण व्हायला सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमधील सोन्याचा दरातील उतार हा आजही पहायला मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम हा भारतातही पहायला मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने घसरण होत असल्याचा ट्रेंड आहे. काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांच्या आकड्यात झालेल्या वाढीमुळे सध्या अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे ग्राहकांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीला पसंती द्यायला सुरूवात केली आहे. सराफा बाजारातील अपडेटनुसार येत्या दिवसांमध्ये लग्नसराईचा मौसम पाहता सोन्या चांदीच्या दरांमध्ये चढ उताराचा ट्रेंड हा कायम राहणार आहे. त्यामुळे येत्या दिवसाच सोन्या चांदीच्या दरांमधील गुंतवणुक पाहतात या दरात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत.

कोरोनाच्या अनलॉक प्रक्रियेच्या काळात भारतात ऑगस्ट महिन्यात सोन्या चांदीचे दर हे चांगलेच वाढले होते. पण ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सोन्याच्या दरामध्ये सध्या वर्षअखेरीस घसरणच पहायला मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दराने ऑल टाईम उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याने ५६ हजार २०० रूपये इतका दर गाठला होता.

सोन्याच्या वाढत्या भावामुळेच ग्राहकांनीही हलके आणि छोट्या आकाराचे सोनेखरेदीसाठी पसंती दिली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात सोन्याला चांगला भाव मिळाला होता. पण सोन्याच्या खरेदीमध्ये मात्र तुलनेत घट झाली आहे असे काही अहवालातून स्पष्ट झाले आहे. बुधवारी ९ डिसेंबरलाही सोन्याच्या दरांमध्ये ११८ रूपयांची घट पहायला मिळाली. बुधवारी सोन्याचा भाव हा प्रति १० ग्रॅमसाठी ४९ हजार २२१ रूपये इतका होता. तर आज गुरूवारी सोन्याच्या दर ४९ हजार २३३ रूपया इतका आहे. याआधीच्या सत्रात सोन्याला प्रति १० ग्रॅमसाठी ४९ हजार ३३९ रूपये इतका दर मिळाला होता. चांदीच्या भावातही ८७५ रूपयांची घट पहायला मिळाली आहे. त्यामुळे चांदीचा दर हा प्रति किलोमागे ६३ हजार ४१० रूपये इतका झाला आहे. गुरूवारी चांदीचा दर हा प्रति किलो ६३ हजार ६१० इतका होता. याआधीच्या सत्रात चांदीला ६४ हजार २८५ रूपये इतका दर मिळाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रेंड पाहता सोन्या चांदीच्या दरात ही घसरण पहायला मिळत आहे.

First Published on: December 10, 2020 11:25 AM
Exit mobile version