राज्यातील १२ शेतकऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते लॅपटॉप वाटप

राज्यातील १२ शेतकऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते लॅपटॉप वाटप

पुरस्कृत शेतकऱ्यांसह राज्यपाल सी. विद्यासागर राव, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्ट्ंगडी

जल व्यवस्थापन, फलोत्पादन, अन्नप्रक्रिया, पशु संवर्धन यांसह विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या १२ शेतकऱ्यांना सोमवार, ५ नोव्हेंबर रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राजभवन येथे लॅपटॉप भेट दिले. जून महिन्यात दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहळ्यात सन्मानित केलेल्या या शेतकऱ्यांना आपल्यातर्फे लॅपटॉप देण्याचे राज्यपालांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार आज लॅपटॉप वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यपालांच्या हस्ते लॅपटॉप वाटप

रोहिणी हट्टंगडी यांची उपस्थिती 

कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी विनोदा, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी प्रास्ताविक केले. शेतकऱ्यांच्या वतीने ब्रम्हदेव सरडे, ता. करमाळा, जि. सोलापूर यांनी मनोगत व्यक्त केले.

राज्यपालांनी वाढवले शेतकऱ्यांचे मनोबल

कृषी ही भारताची संस्कृती असून शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीचा सामना करत देशाला अन्न धान्यामध्ये स्वयंपूर्ण केले. मात्र आज शेतजमीन अनेक तुकड्यांमध्ये विभागली गेली असून शेतकऱ्यांजवळील सरासरी जमीन कमी होत चालली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण गोष्टींचा अंगीकार केल्यास शेतकरी संपन्न होईल, असे राज्यपालांनी सांगितले. राज्यात पाण्याचे संकट गंभीर रूप धारण करत असून अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या दृष्टीने पाण्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज बनली असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

आजचा शेतकरी शिक्षित आहे. त्याला तंत्रज्ञानाची आवड आहे. त्यामुळे कृषी संशोधन तसेच तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. गटशेती केल्यास शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील.
-एकनाथ डवले, कृषी सचिव

पुरस्कारार्थी शेतकऱ्यांची नावं

First Published on: November 5, 2018 8:25 PM
Exit mobile version