आदिवासींनी पिकवलेली मिरची परदेशात

आदिवासींनी पिकवलेली मिरची परदेशात

जव्हार तालुक्यातील पिंपळशेत, हेदीचापाडा, खरोंडा या भागातील 48 आदिवासी शेतकर्‍यांनी लागवड केलेली हिरवी मिरची आमदार सुनील भुसारा यांच्या हस्ते परदेशात रवाना करण्यात आली आहे. हिरव्या मिरचीचा पहिला तोडा 10 टन पाठवण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या हिरवी मिरचीला चांगला हमी भाव मिळावा म्हणून जिंदाल स्टील वर्क्स व ईक्रीश्याट हैदराबाद रुरल, कम्युन्स यांच्या संयुक्त विद्यमाने व फिल्डवर्क काम करणारी आर.सी. संस्थांच्या सहकार्याने मिरचीचे उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे आधुनिक पद्धतीने मिरचीचे उत्पादन घेण्यात आले आहे. स्थानिक आमदार सुनील भुसारा यांच्या हस्ते 10 टन मिरचीचा पहिला तोडा परदेशात पाठवण्यासाठी रवाना करण्यात आला. आदिवासी भागातील आदिवासींना आधुनिक पद्धतीने शेती करण्यास मदत करून रोजगार मिळवून देणार्‍या संस्थांचे आमदार भुसारा यांनी आभार मानले. तसेच यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

First Published on: February 19, 2020 1:54 AM
Exit mobile version