मालाडमध्ये तीन मजली चाळ कोसळली, बचावकार्य सुरू!

मालाडमध्ये तीन मजली चाळ कोसळली, बचावकार्य सुरू!

आज दुपारच्या सुमारास मुंबईच्या मालाड परिसरात तीन मजली चाळ कोसळल्याची घटना घडली आहे. मालवणी परिसरातल्या अब्दुल हमीद मार्गावर ही दुर्घटना घडली. प्लॉट क्रमांक ८ बीच्या ५ नंबरच्या गेटजवळ ही चाळ कोसळली असून त्या ठिकाणी ५ ते ६ जण मलब्याखाली अडकले असल्याची माहिती मिळत आहे. दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या, १ रेस्क्यु व्हॅन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत. मलब्याखाली अडकलेल्यांपैकी २ जणांना आधीच जमलेल्या लोकांनी खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं, तर अजून दोन जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, अजूनही घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे.

First Published on: July 16, 2020 4:01 PM
Exit mobile version