रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मुंबईतील रुग्णांसाठी महत्त्वाची सूचना

रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मुंबईतील रुग्णांसाठी महत्त्वाची सूचना

केंद्र सरकराने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कच्च्या मालावरील कस्टम ड्यूटी हटवली

कोरोनाच्या उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या रेमडेसिवीर औषधासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्याच्या सूचना मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांना केल्या आहेत. रेमडेसिवीर औषधाचा फार मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने (सीडीएससीओ) राज्यांच्या औषध प्रशासनाला परिपत्रकाद्वारे दिले होते.

यापार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना अस्लम शेख यांनी यापुढे रेमडिसिवीर औषधासाठी रुग्णांना आधारकार्ड दाखविणे बंधनकारक करण्यात येईल. ज्या रुग्णांना रेमडेसिवीर औषधाचा डोस देण्यात आला आहे. त्या रुग्णांची नोंद त्यांच्या आधारकार्डसह ठेवणे रुग्णालयांना बंधनकारक असेल, असे सांगितले. तसे न केल्यास त्वरित फौजदारी गुन्हा दाखल होईल, असेही ते म्हणाले.

कोरोनावर सध्या ठोस असे कोणतेही औषध नाही. परंतु रेमडेसिवीर या औषधाचा अनेकांना उपयोग होत आहे. ठराविक कंपन्यांना औषधाच्या निर्मितीची मान्यता दिल्याने या औषधांचा तुडवडा जाणवत होता. परंतु येत्या काही दिवसात हा तुडवडा कमी होईल, असा विश्वासही शेख यांनी व्यक्त केला.

First Published on: July 10, 2020 7:51 PM
Exit mobile version