वकील गुणरत्न सदावर्तेंची एसटी बँकेच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याची घोषणा

वकील गुणरत्न सदावर्तेंची एसटी बँकेच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याची घोषणा

Gunaratna Sadavarte announces to contest ST Bank elections

वकील गुणरत्न सदावर्तेंनी (रविवारी) आज एसटी बँकेच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याची घोषणा केली. एसटी महामंडळाच्या बँकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेची सत्ता आहे. या संघटनेच्या विरोधात सदावर्तेंनी घोषणा केलेली संघटना निवडणूक लढणार आहे.

बँक ही सहकार क्षेत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक व्यक्ती, एक पद याप्रमाणे बँक, मत आणि उमेदवारीची प्रक्रिया निश्चित केली आहे. बँक कोणाच्या बापाच्या घरची नाही. बँकेत कोणाला भ्रष्टाचार करण्यास मोकळीक दिलेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळातील कष्टकरी स्वतः स्वतःची माणसे निवडतील. आतापर्यंत राजकीय बॉसकडून शेतातील बुजगावण्याप्रमाणे लोकं उभी केली जात होती, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

राजकीय पुढाऱ्यांचे बुजगावणे कष्टकऱ्यांना १४-१५ टक्के व्याजाने पैसे देऊन शोषण करतात. हेच बुजगावणे इतर राज्यांना ७-८ टक्के व्याजाने पैसे द्यायचे. आमची बँक, आमचा पैसा, आमचे कष्ट, आमचे श्रम आणि पैसा मर्जीतील लोकांना दिला जायचा. इतर राज्यांना ७ टक्क्याने पैसे दिले जातात. मग इकडे ७ टक्क्याने पैसे का दिले जात नाहीत, असा प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांनी विचारला असून आम्ही आमची लढाई विना दारू, विना मटण, विना पैशाची लढू आणि एसटी बँकेवर आमचा ध्वज फडकेल, असे सदावर्ते म्हणाले.

First Published on: May 8, 2022 5:14 PM
Exit mobile version