मुर्खाचा बाजार सुरु आहे, मग जिम का नाही? राज ठाकरे सरकारवर संतापले

मुर्खाचा बाजार सुरु आहे, मग जिम का नाही? राज ठाकरे सरकारवर संतापले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी १५ मार्चपासून जिम बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत सलून, मॉल, बाजारपेठा हळुहळु उघडण्यात आल्या आहेत. केंद्रानेही जिम उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र राज्य सरकारने अद्यापही जिम सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही. यानिमित्ताने जिम व्यावसायिक आणि बॉडी बिल्डर्सनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपली व्यथा मांडली. यावर राज ठाकरे यांनी संतप्त भावना व्यक्त करत म्हणाले की, “सगळीकडे मुर्खाचा बाजार सुरु केला आहे. मग जिम बंद का? तुम्ही जिम उघडा बघू काय होतं ते.”

राज ठाकरेंनी यावेळी राज्य सरकावर खरपूस टीका केली. केंद्र सरकार सांगत आहे की, “जिम सुरु करा, आऊटडोअर स्पोर्ट सुरु करा. राज्य हे सुरु करण्यास तयार नाही. मग राज्याला काय वेगळी अक्कल आहे का? जिम सुरु करण्याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. ते देखील याबाबत सकारात्मक आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन जिम मालकांनी जिम सुरु करायला काही हरकत नाही. कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहणार नाही. याची काळजी घ्या आणि इम्युनिटी वाढवा” अशी ठाम भूमिका घ्या.

जिम व्यावसायिकांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “गोल्फ आणि टेनिस यापेक्षा जास्त फिजिकल डिस्टन्स इतर खेळात नाही. मी तर टेनिस खेळायला सुरुवात केली आहे, बघू काय होतंय. सगळे मार्केट सुरु आहेत. हा सगळा मुर्खाचा बाजार सुरु आहे.”

First Published on: August 11, 2020 12:32 PM
Exit mobile version