एक रुपयात १० सॅनिटरी नॅपकिन, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

एक रुपयात १० सॅनिटरी नॅपकिन, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

एक रुपयात १० सॅनिटरी नॅपकिन ,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या पार्श्वभूमीवर दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू करणार असल्याची घोषणाग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी दिली. यामुळे राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार असून त्यासाठी वर्षाला २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.

मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि जागतिक प्रश्न आहे. गेल्या वर्षात मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने तसेच स्वच्छतेअभावी जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. स्त्रियांच्या होणाऱ्या मृत्यूमागे हे सर्वात मोठे कारण असून, हा प्रश्न कमी करण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी ग्रामविकास खात्याकडून नाममात्र किमतीत सॅनिटरी नॅपकिन ही नवीन योजना राबवण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

भारतात दरवर्षी १२० दशलक्षाहून अधिक महिलांना मासिक पाळीचा त्रास होऊन आजारांचा सामना करावा लागतो. भारतात ३२० दशलक्ष मासिक पाळी होणाऱ्या स्त्रियांपैकी केवळ १२ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. यामुळे चार वर्षे भारतात ६० हजारहून अधिक स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोगामुळे होणारा मृत्यू पैकी दोन तृतीयांश मृत्यू मासिक पाळीबद्दलच्या निष्काळजीपणामुळे होतो. महाराष्ट्रात केवळ ६६ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. याबद्दलही शहरी भागाचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागातील फक्त १७.३० टक्के स्त्रियांपर्यंत सॅनिटरी नॅपकिनची सुविधा पोहोचत असते. या समस्येच्या मुळाशी गेले असता सॅनिटरी पॅड वापरण्याबाबत जागृकता नसणे, सॅनेटरी पॅड खरेदी करण्याची समस्या उद्भवणे अशा अनेक प्रश्नांना स्त्रिया सामोरे जात असतात.

सध्या राज्यात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत फक्त १९ वर्षाखालील युवतींना सहा रुपयात सहा नॅपकिन्स असलेले कीट पुरवण्यात येतात. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत दारिद्र्यरेषेखालील सर्व युवती, महिलांना या समस्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना आणि बचत गटांमधील महिलांना एक रुपये नाममात्र किमतीमध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये –

First Published on: May 28, 2022 9:27 PM
Exit mobile version