कांदिवली परिसरारातून जप्त केले भेसळयुक्त आईस्क्रीम, एफडीएची कारवाई

कांदिवली परिसरारातून जप्त केले भेसळयुक्त आईस्क्रीम, एफडीएची कारवाई

अन्न औषध विभागाने धाड टाकून हानिकारक आईस्क्रीम ताब्यात घेतले.

मुंबईत दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. त्यामुळे मुंबईकर हैराण झाल्याचे पहायला मिळत आहे.

उष्णतेचा सर्वात जास्त त्रास बच्चे कंपनीला होतो. शरीराला थोडा तरी थंडावा मिळावा म्हणून शीत पेयांचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं. बच्चे कंपनी ही थंडावा मिळण्यासाठी आपल्या पालकांकड़े आईस्क्रीमची मागणी करतात. अखेर नाइलाजास्तव पालकांना लहान मुलांच्या हट्टापायी आईस्क्रीम द्यावे लागते. पण, उन्हाळ्यात आईस्क्रीमची मागणी वाढत असल्याने आईस्क्रीम आणि कुल्फीमध्ये भेसळीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

दोन ठिकाणी धाड 

मुंबईत दोन ठिकाणी आईस्क्रीम उत्पादन कंपण्यावर अन्न – औषध विभागाने धाड टाकली. अन्न – औषध विभागाने कांदिवलीतील चारकोप सेक्टर ८ मधील प्लॉट नंबर ८२ मध्ये दीप्ती डिसर्ट या आइसक्रीम उत्पादन करणाऱ्या कंपनीवर कारवाई केली. तसेच दहिसर येथील कांदळपाडा प्रमिला नगर गाळा क्रमांक ७ मधील सुपर स्टार मीना आईस्क्रीम पार्लरवर देखील अन्न औषध विभागाने धाड टाकून हानिकारक आईस्क्रीम ताब्यात घेतले. कांदिवलीत धाड टाकलेल्या आईस्क्रीम मध्ये हानिकारक पदार्थ आढळून आले. तसेच आइसक्रीम मध्ये वापरल्या जाणारे कलर आणि पदार्थ यांची तारीख संपलेली असल्याचे आढळून आल्यामुळे अन्न औषध विभागाने जवळपास मलाई कुल्फी १० किलो आणि आईस्क्रीम बटर स्कॉच १७८ लीटर जप्त केला. अन्न औषध विभागाने कांदिवलीतील उत्पादन कंपनीतुन ५२ हजार ७०० रुपयांचे आईस्क्रीम जप्त केले असुन आईस्क्रीमचे नमूने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

First Published on: May 23, 2018 8:54 AM
Exit mobile version