आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना लस घेण्यास टाळाटाळ

आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना लस घेण्यास टाळाटाळ

राज्यात कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येत आहे. शनिवारी १६ जानेवारी २०२१ पासुन राज्यासह देशात कोरोना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आतपर्यंत लाखो आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. परंतु राज्यात काही कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना लसीकरणाला अल्पसा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राज्यात पहिल्या तीन दिवसांत एकूण १,५१३ कर्मचाऱ्यांनी लस घेण्याकडे पाठ फिरवली आहे. आता गुरुवारी आणि शुक्रवारी पार पडणाऱ्या लसीकरणात किती कर्मचारी कसा प्रतिसाद देतात यावर राज्यातील आरोग्य विभागाचे लक्ष आहे. दरम्यान कोरोना लसीच्या अफवांमुळे काही आरोग्य कर्मचारी कोरोना लस घेण्यात टाळाटाळ करत आहेत.

भारतातील आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेली लस ही भारतीय बनावटीची आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ही लस बनवण्यात आलेली आहे. मुंबईत १६ जानेवारीला लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. परंतु पहिल्याच दिवशी कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाड झाल्याने लसीकरणाला दोन दिवस स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे मंगळवार आणि बुधवार मुंबईत कोरोना लसीकरण झाले नाही. राज्यात एका दिवसात १३०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

First Published on: January 22, 2021 8:20 PM
Exit mobile version