मुंबईकरांनो पुढील दोन दिवस सतर्क राहा!

मुंबईकरांनो पुढील दोन दिवस सतर्क राहा!

मुसळधार पाऊस

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात.दादरमधील हिंदमाता परिसरात पाणी साचलायला सुरूवात झाली आहे. याचा परिणाम  वाहतुकीवर झाला आहे. मुंबईसह उपनगरातही जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरात अंधेरी, विलेपार्ले, गोरेगाव, दहिसर, बोरिवलीत मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अंधेरी सबवेला पाणी साचलं आहे.

हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून मुंबईकरांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई तसेच मुंबई नजीकच्या परिसरात येत्या २४ तासांमध्ये अति मुसळधार पावसाचे संकेत हवामान विभागामार्फत देण्यात आले आहेत. हवामान विभागाने रडार तसेच सॅटेलाईट इमेजच्या आधारावर स्पष्ट केले आहे की मोठ्या प्रमाणात पश्चिम किनारपट्टीवर ढगांची गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या २४ तासांमध्ये मुंबईसह परिसरात अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये मध्यम स्वरूपाचा असा पाऊस झाला. तर पुढच्या ४८ तासांमध्ये पावसाचा जोर वाढेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

 संपुर्ण महाराष्ट्रासाठी यलो तसेच ऑरेंज एलर्ट हवामान विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणासाठी हा एलर्ट देण्यात आला आहे. कोकणात सिंधुदुर्ग येथे आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे. कोकणाचाच भाग असलेल्या मुंबईसह ठाणे पालघर, रायगड आणि रत्नागिरी भागातही मोठ्या पावसाची शक्यता ही येत्या २४ तासांमध्ये हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सकाळी ८.३०पर्यंत मुंबईत वांद्रे येथे ६३ मिलीमिटर, महालक्ष्मी येथे २१ मिमी आणि राम मंदिर स्टेशन येथे २१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासांत डहाणू येथे १२८ मिमी, कुलाबा येथे १२१.६ मिमी, सांताक्रुझ येथे ९६.६ मिमी., रत्नागिरी येथे १०१.३ मिमी आणि अलिबाग येथे १२२.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

First Published on: July 15, 2020 10:29 AM
Exit mobile version