मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस; सखल भागात साचले पाणी

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस; सखल भागात साचले पाणी

मुंबईत मुसळधार पाऊस

मुंबईसह उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही भागांमध्ये वादळवाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवू लागला. दोन दिवस दमदर पाऊस पडल्यानंतर शुक्रवारी पावसाने थोडी विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र शनिवारी पहाटेपासूनच पावसाने जोर धरला असून पुन्हा एकदा शहरात हजेरी लावली. पवई, घाटकोपर, वांद्रे, चेंबूर, लालबाग, सायन, दादर, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, बोरिवलीसह अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या.

तर ठाणे जिल्ह्यासह कल्याण, डोंबिवली परिसरातही आज सकाळपासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही साधारण अशीच परिस्थिती आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र मुंबईच्या ठिकठिकाणी पाहायला मिळाले. मुंबईत किंग्ज सर्कल तसेच कुर्ला, घाटकोपर येथील सखल भागात पाणी साचले.

हेही वाचा –

मराठी मजूर आणि पर्यटक महाराष्ट्रात येऊन रडले

First Published on: June 6, 2020 9:03 AM
Exit mobile version