२४ तासांत मुसळधार पाऊस; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’

२४ तासांत मुसळधार पाऊस; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’

मुंबईसह राज्यभरात येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेने असा अंदाज वर्तवला आहे. तसेच,’ गरज असेल तरच घराबाहेर पडा’, असेही आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. मुंबईसह उपनगरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची आणि अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मुंबई हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून २४ तासात २०० मिलीमीटर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गरज असेल तरच घराबाहेर पडा

आज सकाळपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. तसाच पाऊस दिवसभर राहिल, असेही सांगण्यात आले आहे. अशा आशयाचे मुंबई पोलीस आयुक्तांनीही ट्विटरद्वारे मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या अनेक दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे सेवेवर देखील याचा परिणाम होत असल्याने चाकरमान्यांची मोठी अडचण होत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असल्याने रस्तेही पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.


हेही वाचा – मुसळधार पाऊस, तरीही जायकवाडी तहानलेलंच

हेही वाचा – मुंबईत पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस; पोलिसांनी दिला सतर्कतेचा इशारा


 

First Published on: July 9, 2019 8:04 AM
Exit mobile version