काळाचौकी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

काळाचौकी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

काळाचौकीतील गणपती मंडळाकडून पूरग्रस्तांना मदत

धरणाच्या पाणीसाठ्याने धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात आला. याच विसर्गात संपूर्ण सांगली आणि कोल्हापूर जिल्हा पाण्याखाली गेला होता. कित्येक गावच्या गावं पाण्याखाली गेली होती. गावकऱ्यांची घरे, जिल्हा परिषदेच्या शाळा, सरकारी कार्यालये आणि महत्त्वाचे म्हणजे शेत जमिनी यांचे अतोनात नुकसान झाले. आर्थिक नुकसानीने तर कहरच केला होता. अशा प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातून सांगली, कोल्हापूर येथे मदतीचा ओघ सुरू झाला होता.

या वस्तूंचे केले वाटप 

नुकत्याच घडलेल्या या पूरग्रस्त परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सतत सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या काळाचौकीचा महागणपती उत्सव मंडळाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील धामणी आणि बामणी या दोन्ही गावात मंडळाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गावकऱ्यांना करण्यात आले. चादर, ब्लँकेट, भांडी, तांदूळ, डाळ, बिस्कीटे, प्रथमोपचाराची औषधे, साड्या, नवीन कपडे, लहान मुलांसाठी शालेयपयोगी स्टेशनरी अशा नेहमीच्या वापरातील गरजेच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जवळपास ३ लाख ७५ हजार रूपयांच्या वस्तू मुंबईवरून कार्यकर्त्यांनी नेऊन वाटप केले. मंडळाचे अध्यक्ष विजय दाऊ लिपारे, प्रमुख कार्यवाह अमन दळवी, नितीन केरकर, आशिष कामतेकर, सुनील सावंत, शेखर साळवी,संतोष दळवी, रवी मुंबरकर, अमरदीप गोसावी, अतुल मेस्त्री, पांडुरंग दाभोळकर, गणेश महाडेश्वर, उदय परुळेकर, संकेत देशमुख यांच्या नियोजनात ‘एक हात मदतीचा, आपल्या माणसांसाठी’, या भावनेने मंडळाच्या वतीने हा सामाजिक उपक्रम करण्यात आला. या उपक्रमात सांगलीतील गजानन मोरे, धामणीचे सरपंच यांनी विशेष सहकार्य केले.

हेही वाचा –

साताऱ्यात बेछूट गोळीबार; एकाची हत्या

जी स्वप्न दाखवली ती पुर्ण करण्यात सरकार अपयशी – अजित पवार

First Published on: August 21, 2019 11:10 AM
Exit mobile version