जीपीओच्या इतिहासात पहिलाच हेरीटेज वॉक!

जीपीओच्या इतिहासात पहिलाच हेरीटेज वॉक!

जीपीओच्या इतिहासात पहिलाच हेरीटेज वॉक

इतिहासप्रेमी तसेच पर्यटक आणि सर्वसामान्यांसाठी बुधवारी जीपीओच्या हेरिटेज वॉकला सुरूवात करण्यात आली. पर्यटन मंत्रालय आणि भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. जीपीओच्या ऐतिहासिक महत्त्व पाहता अशा प्रकारचा हा पहिलाच पुढाकार आहे. आजच्या पहिल्या हेरिटेज जीपीओच्या वॉकच्या निमित्ताने मुंबईतील ३० टुरीस्ट गाईडने सहभाग घेतला होता. येत्या २७ सप्टेंबरला दुसरा टुरीस्ट गाईडचा हेरीटेज वॉक आयोजित करण्यात येणार आहे, असे ऑर्किडा मुखर्जी यांनी सांगितले.

जीपीओच्या इमारतीचे क्षेत्रफळ १ लाखापेक्षाही जास्त

मुंबई जीपीओच्या ऐतिहासिक वास्तुच्या परंपरेच्या इतिहासात अशा प्रकारच्या हेरीटेज वॉकचा हा पहिलाच प्रयत्न मुंबई विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. या संपुर्ण हेरीटेज वॉकसाठीचे समन्वय ऑर्किडा मुखर्जी यांनी केले. मुंबईत येणाऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठ्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीचा इतिहास तसेच रचना जाणून घेण्यासाठीचा हा पुढाकार आहे. कर्नाटकातील विजापूर येथील गोल घुमटासारखी ही प्रतिकृती आहे. ब्रिटीश वास्तुविशारद जॉन बेग यांनी १९०२ मध्ये या संपुर्ण इमारतीच्या उभारणीसाठीचे काम सुरू केले. तर या इमारतीचे बांधकाम हे १९१३ मध्ये पुर्ण झाले. ही संपुर्ण इमारत बांधण्यासाठी १८,०९,००० रूपये इतका खर्च आला. १ लाख २० हजार चौरस फुट इतके या जीपीओच्या इमारतीचे क्षेत्रफळ आहे.

First Published on: September 25, 2019 10:23 PM
Exit mobile version