कंगना रनौत कार्यालय कारवाईप्रकरणी हायकोर्टाने महापालिकेला फटकारले

कंगना रनौत कार्यालय कारवाईप्रकरणी हायकोर्टाने महापालिकेला फटकारले

मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौत हिच्या वांद्रे पाली हिल येथील कार्यालयावर कारवाई केली होती. त्यात कंगनाच्या २ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. कंगनाने या प्रकरणी नुकसान भरपाईचा दावा मुंबई महापालिकेकडे केला होता. त्यासाठी तिने मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. दरम्यान, या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने आज झालेल्या सुनावणीत महापालिकेला फटकारले असून उद्या पुन्हा या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, कंगना राणावतच्या कार्यालयावरील कारवाईच्या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आलेले मुंबई महापालिकेचे अधिकारी भाग्यवंत लाटे तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागितली आहे. ही मुभा देताना कोर्टाने मुंबई महापालिकेला खडे बोल सुनावले आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे माझ्या कार्यालयावर केली गेली, असे म्हणत कंगनाने संजय राऊत यांना या प्रकरणात ओढले आहे. तसेच, तोडकामाची कारवाई करणारे सहाय्यक आयुक्त लाटे यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यांच्याकडून कोर्टाने स्पष्टीकरण मागवले होते.

या प्रकरणी आज न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागणाऱ्या लाटे यांच्या वकिलांना, ‘इतर वेळी तुम्ही तत्पर असता आणि जेव्हा उत्तर द्यायची वेळ येते तेव्हा मुदत मागता,’ असे बोलत फटकारले. तर ‘संजय राऊत हे संसद अधिवेशनासाठी दिल्लीत असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. त्यामुळे हायकोर्टाने त्यांना नंतर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुभा दिली. मात्र, कार्यालय अंशतः तोडलेल्या अवस्थेत असल्याने आणि पावसाळा सुरू असल्याने सुनावणी अधिक लांबवू शकत नाही, असे बजावत हायकोर्टाने उद्या याचिकादारांच्या वकिलांना युक्तिवाद सुरू करण्यास परवानगी दिली.

हेही वाचा –

किशोरी पेडणेकर यांनी महापौरपद सोडावे – किरीट सोमय्या

First Published on: September 24, 2020 4:14 PM
Exit mobile version