सार्वजनिक उत्सवात बेकायदेशीर मंडप नको – मुंबई हायकोर्ट

सार्वजनिक उत्सवात बेकायदेशीर मंडप नको – मुंबई हायकोर्ट

उच्च न्यायालय

गणेशोत्सव अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपला असून आता गणपतीनंतर नवरात्रीही येणार आहे. यावेळी जागोजागी सार्वजनिक मंडळे मंडप उभे करत असतात. मुंबई हायकोर्टाने याची दखल घेत सर्व मंडळाना सक्त ताकीद दिली आहे. यावेळी एकही बेकायदेशीर मंडप उभारल्यास पालिका आणि राज्य सरकारने सक्त कारवाई करावी, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. यासोबतच कोणत्याही मंडळाने जर बेकायदेशीर मंडप उभारल्यास हा कोर्टाच्या निर्णयाचा अवमान मानला जाईल, असेही सांगितले आहे.

First Published on: August 7, 2018 4:55 PM
Exit mobile version