या आहेत पावसाळ्यातील भरतीच्या तारखा; मुंबईची ‘तुंबई’ होणार?

या आहेत पावसाळ्यातील भरतीच्या तारखा; मुंबईची ‘तुंबई’ होणार?

प्रातिनिधिक छायाचित्र

समुद्राच्या उधान भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस पडला तर काय होते, हे मुंबईकरांनी २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीत अनुभवले आहे. त्यामुळे तेव्हापासून एकुणच आपत्ती व्यवस्थापनात समुद्रातील उधान भरतीच्या वेळा लक्षात घेतल्या जाऊ लागल्या आहेत. अशी भरती आणि अतिवृष्टी असा योग जुळून आला की ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचून मुंबई शहराची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता असते.

ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी येत्या पावसाळ्यात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीला पाण्याला उधान येईल, असे सांगितले आहे. त्यांनी भरतीचे दिवस आणि वेळा कळविल्या असून यादिवशी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. दर्शविलेली उंची ही भरतीच्या पाण्याची असते, समुद्राच्या लाटांची नसते असेही त्यांनी नमूद केले आहे.

भरतीचे वेळापत्रक – २०१९

१) सोमवार, १७ जून दुपारी १२.१८ भरतीची उंची ४.५१ मीटर.

२) मंगळवार, २ जुलै सकाळी ११.५२ भरतीची उंची ४.५४ मीटर.

३) बुधवार, ३ जुलै दुपारी १२.३५ भरतीची उंची ४.६९ मीटर

४) गुरुवार, ४ जुलै दुपारी १.२० भरतीची उंची ४.७८ मीटर.

५) शुक्रवार, ५ जुलै दुपारी २.०६ भरतीची उंची ४.७९ मीटर.

६) शनिवार, ६ जुलै दुपारी २.५२ भरतीची उंची ४.७४ मीटर.

७) रविवार, ७ जुलै दुपारी ३.४१ भरतीची उंची ४.६० मीटर.

८) बुधवार, ३१ जुलै सकाळी ११.३१ भरतीची उंची ४.५३ मीटर.

९) गुरुवार, १ ऑगस्ट दुपारी १२.१६ भरतीची उंची ४.७४ मीटर.

१०) शुक्रवार, २ ऑगस्ट दुपारी १२.५९ भरतीची उंची ४.८७ मीटर.

११) शनिवार, ३ ऑगस्ट दुपारी १.४४ भरतीची उंची ४.९० मीटर.

१२) रविवार, ४ ऑगस्ट दुपारी २.२९ भरतीची उंची ४.८३ मीटर.

१३ ) सोमवार, ५ ऑगस्ट दुपारी ३.१४ भरतीची उंची ४.६५ मीटर.

१४) गुरुवार, २९ ऑगस्ट सकाळी ११.११ भरतीची उंची ४.५३ मीटर.

१५) शुक्रवार, ३० ऑगस्ट सकाळी ११.५३ भरतीची उंची ४.७७ मीटर.

१६) शनिवार, ३१ ऑगस्ट दुपारी १२.३४ भरतीची उंची ४.९० मीटर आणि रात्री १२.४७ भरतीची उंची ४.६१ मीटर.

१७) रविवार, १ सप्टेंबर दुपारी १.१५ भरतीची उंची ४.९१ मीटर उत्तररात्री १.३३ भरतीची उंची ४.६७ मीटर.

१८) सोमवार, २ सप्टेंबर दुपारी ३.५८ भरतीची उंची ४.७९ मीटर, उत्तररात्री २.१९ भरतीची उंची ४.५८ मीटर.

१९) मंगळवार, ३ सप्टेंबर दुपारी २.४१ भरतीची उंची ४,५४ मीटर.

First Published on: May 26, 2019 5:39 PM
Exit mobile version