राहुल गांधींच्या ‘मोहब्बतच्या दुकाना’त हिंदूंना स्थान नाही; नितेश राणेंनी साधला निशाणा

राहुल गांधींच्या ‘मोहब्बतच्या दुकाना’त हिंदूंना स्थान नाही; नितेश राणेंनी साधला निशाणा

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी (31 मे) कॅलिफोर्नियामध्ये भारतीयांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी काही लोकांनी खलिस्तानी झेंडे फडकावत खलिस्तानच्या मागणीबाबत घोषणाबाजी केली. या प्रकरणी भाजपा नेते नितेश राणे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. (Nitesh Rane say Hindus have no place in Rahul Gandhi’s ‘love shop’)

नितेश राणे म्हणाले की, राहुल गांधी अमेरिकेला गेल्यानंतर खलिस्तान जिंदाबादचे नारे काल ऐकायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींजी गेल्यानंतर जगामध्ये एक वेगळा अभिमान पाहायला मिळतो. मग तिकडचे भारतीय असो किंवा त्या-त्या देशाचे स्थानिक नागिरक असो, ते मोदींना सन्मान देतात. मात्र काल राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये आपलं राष्ट्रगीत सुरु असताना समोरचे लोकं उभे पण राहिले नाहीत. राहुल गांधी बोलतात ‘में मोहब्बत की दुकान यहा खोलने आया हू.’ मात्र राहुल गांधींच्या मोहब्बतच्या दुकानात हिंदूंना स्थान नाही, अशी टीका नितेश राणे केली आहे.

नितेश राणे म्हणाले की, काँग्रेसने एक मोहब्बतचे दुकान कर्नाटकमध्ये उघडले आहे. त्यामुळे आज कर्नाटकमध्ये हिंदुंची काय अवस्था झाली आहे हे जाऊन बघितले पाहिजे. राहुल गांधींच्या मोहब्बत दुकानामध्ये पाकिस्तान जिंदाबादचे झेंडे फडकावत घोषणा दिल्या जातात. राहुल गांधींच्या मोहब्बतच्या दुकानामध्ये हिंदु मंदिरांसमोर हिरवे झेंडे फडकवून डिजे लावला जातो. तर मग याला राहुल गांधी मोहब्बत की दुकान कसे बोलतात. हिंदूंचा अपमान करणे म्हणजे राहुल गांधींचे मोहब्बतचे दुकान उघडणे किंवा काँग्रेसचे मोहब्बतचे दुकान उघडणे, असा उल्लेख करत नितेश राणे राहुल गांधींसह काँग्रेसवर हल्लाबोल केला.

खलिस्तान समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी
काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. ते एका कार्यक्रमात भाषण देत असताना खलिस्तान समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खलिस्तानचे झेंडेही फडकावण्यात आले. खलिस्तानी समर्थकांनी या कार्यक्रमात गुपचूप झेंडे सोबत आणल्याचे समजते. यावेळी राहुल गांधींसमोर खलिस्तान समर्थकांनी भारताव्यतिरिक्त स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधातही घोषणाबाजी केली. भाषण सुरू असताना अचानक अचानक खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केल्यामुळे सर्वच हादरले. खलिस्तान समर्थकांनी घोषणाबाजी सुरू करताच राहुल गांधींनी आपले भाषण थांबवले आणि फक्त ‘मोहब्बत की दुकान’, ‘मोहब्बत की दुकान’ असे वक्तव्य करत राहिले. मात्र, खलिस्तान समर्थकांवर याचा काहीही परिणाम झाला नाही आणि ते घोषणा देत राहिल्याचे पाहायला मिळाले.

First Published on: June 1, 2023 11:01 AM
Exit mobile version