मुंबईत होम क्वारंटाईन केलेल्यांची संख्या महिन्याभरात ४०० टक्क्यांनी वाढली

मुंबईत होम क्वारंटाईन केलेल्यांची संख्या महिन्याभरात ४०० टक्क्यांनी वाढली

होम क्वारंटाईन केलेला शिक्का

मुंबईत कोरोना व्हायरसचा कहर वाढत आहेच. दिवसेंदिवस पॉझिटिव्ह केसेस आणि मृतांचा आकडा वाढत आहे. मात्र यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक क्वारंटाईन केलेल्यांची संख्या आहे. एप्रिल महिन्याच्या १५ तारखेला मुंबईत ४३,२४९ इतक्या लोकांना होम क्वारंटाईन केले होते. तर हाच आकडा सध्या २ लाख ३४ हजारांपर्यंत पोहोचला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ही आकडेवारी देण्यात आलेली आहे. एप्रिल महिन्यात ६ सहा तारखेला मुंबईत होम क्वारंटाईन केलेल्यांची संख्या १०,९६८ होती. तर हीच संख्या १७ एप्रिल रोजी ५३,११८ जाली. मुंबईत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत चालेला आहे. त्यासाठी ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, एखादा व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला त्याच्या संपर्काताली अति जोखमीच्या व्यक्तींची माहिती विचारली जाते. त्यानुसार त्या व्यक्तींना १४ दिवसांसाटी क्वारंटाईन करण्यात येते. जर त्यांच्यात काही लक्षणे दिसून आल्यास त्यांची कोविड टेस्ट घेण्यात येते. अति जोखमीच्या व्यक्तिंमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येते. तसेच नवीन पॉझिटिव्ह रुग्णांच्या सोबतची तीच प्रक्रिया पुर्ण केली जाते.

सध्या होम क्वारंटाईन असलेल्या २ लाक ३४ हजार जणांपैकी १२,६३६ लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन सुविधा पुरवली गेली आहे. तसेच ९५ हजार १५४ लोकांनी आतापर्यंत १४ दिवसांचा क्वारंटाईन पिरियड पुर्ण केलेला आहे. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत, त्या परिसराला कटेंन्मेंट झोन घोषित केले जाते. मुंबईत सध्या ६६१ कटेंन्मेंट झोन आहेत. तसेच १,११० इमारतींना सील करण्यात आले आहे.

First Published on: May 18, 2020 3:11 PM
Exit mobile version