राज्यात होमिओपॅथी महाविद्यालय लवकरच

राज्यात होमिओपॅथी महाविद्यालय लवकरच

आमदार अमित देशमुख

गेल्या काही वर्षांत होमिओपॅथी औषधप्रणालीचा जगभर प्रसार होत आहे. युरोप, अमेरिका, आखाती देशांसह प्रगत देशांत होमिओपॅथीकडे लोक मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. राज्यात आज होमिओपॅथीची ५४ महाविद्यालये असून ती खासगी आहेत. येणार्‍या काळात शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची घोषण वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. त्यानुसार यासंदर्भात लवकरच कार्यवाही करण्याची सूचना देखील त्यांनी केली आहे.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी यांच्या वतीने देण्यात येणारे डॉ. हॅनिमन जीवनगौरव पुरस्काराचे वितरण वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. विधान परिषद सदस्य विक्रम काळे, विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ होमिओपॅथी मेडीकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्रचे सचिव पृथ्वीराज पाटींल, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, कोणताही आजार असलेल्या रुग्णाला त्याचा आजार बरा होणे नाही याबरोबरच तो आजार समूळ नाहीसा होणे आवश्यक असते. आजाराचे मूळ शोधून त्यावर परिणामकारक उपचार हे होमिओपॅथीचे वैशिष्ठ्य आहे. त्यामुळेच होमिओपॅथीचे फक्त इफेक्टस आहेत, साईड इफेक्टस नाहीत. होमिओपॅथीमध्ये अनेक दुर्धर आजार बरे करण्याची शक्ती आहे हे सिद्ध झाले आहे. होमिओपॅथीवर विश्वास होत असल्याचे त्यांनी सांगितले.

होमिओपॅथीमध्ये संशोधन होणे आवश्यक
आज महाराष्ट्रात अशी अनेक गावे आहेत जेथे होमिओपॅथी डॉक्टर पोहोचले असून सेवाभावाने रुग्णांची सेवा करीत आहे. होमिओपॅथीची जपणूक होणेही आवश्यक आहे. आज होमिओपॅथीचा अभ्यास अनेक विद्यार्थी करतात. येणार्‍या काळात विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमातून काय अपेक्षित आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाला कळवाव्यात. विद्यार्थ्यांनी होमिओपॅथीमध्ये संशोधन आणि विकास करण्याची गरज आहे. याचा रुग्णांना आणि या क्षेत्रालाही त्याचा फायदा होईल. त्यादृष्टीने डॉक्टरांनी प्रयत्न करावे, असे देशमुख यावेळी म्हणाले.

तीन डॉक्टरांना मरणोत्तर विशेष पुरस्कर
औरंगाबादचे कै. डॉ. शांतीलाल मोतीलाल देसरडा, ठाण्याचे कै. डॉ. मिलिंद वासुदेव राव आणि परभणीचे कै. डॉ. संदीप सोनापंत नरवाडकर यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार देण्यात आला. हे पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांनी यावेळी स्वीकारले. तर या कार्यक्रमात सन 2012 ते सन 2020 पर्यंत असे एकूण आठ वर्षातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते 24 डॉक्टरांना यावेळी डॉ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

First Published on: January 29, 2020 2:56 AM
Exit mobile version