आता सोसायट्यांमध्ये टोळक्याने दिसाल तर होईल कारवाई

आता सोसायट्यांमध्ये टोळक्याने दिसाल तर होईल कारवाई

Police in Maharashtra s Thane district murdering a 25 year old youth Aakash Thube lives in vasant Vihar area

सध्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे घराबाहेर जाण्यास बंदी आहे. तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना घराबाहेर जाण्याची मुभा आहे. त्यामुळे अनेक जण घरात बसून आहे. परंतु, घरात किती वेळ बसणार असा प्रत्येकालाच प्रश्न पडला आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांमधील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत बरेच जण एकत्र येऊन खेळतात. तर काही जण उन्हाळा असल्यामुळे सोसायटीच्या अंतर्गत भागामध्ये, पार्किंग एरिया, टेरेस आधी ठिकाणी जाऊन बसतात. मात्र, आता एकत्र टोळक्यांनी बसल्यास पोलिसांकडून धडक कारवाई केली जणार आहे.

५ पेक्षा जास्त नागरिक एकत्र जमल्यास कारवाई

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ लागू असून शहरातील गृहसंकुले, सोसायटीच्या अंतर्गत भागामध्ये, पार्किंग एरिया, टेरेस या आदी ठिकाणी कोणत्याही कारणास्तव ५ पेक्षा जास्त नागरिक एकत्र जमल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सोसायट्यांचे अध्यक्ष आणि सचिव यांनी महापालिकेच्या मार्गदर्शक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. या नियमावलीचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

दरम्यान, सोसायटीमध्ये राहणाऱ्या सर्व व्यक्तींच्या वर्तणूकीसाठी सोसायटीचा कॉमन एरिया, टेरेस याठिकाणी मॉर्निंग वॉक, ईव्हिनींग वॉकसाठी कोणीही व्यक्ती अत्यावश्यक कारण वगळता फिरणार नाही. घराबाहेर पडणार नाही, अशी नियमावली प्रसिद्ध करावी. मात्र, रहिवाशांनी सादर करण्यात आलेल्या नियमावलीमधील तरतुदींचा भंग केल्यास त्यांच्यावर प्रथम दंडात्मक कारावाई करण्यात येणार. तसेच दुसऱ्या वेळीही अशी व्यक्ती आढळल्यास अध्यक्ष आणि सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.


हेही वाचा – CoronaVirus : महापालिकेत एकूण १० सनदी अधिकाऱ्यांची फौज


 

First Published on: April 28, 2020 12:09 AM
Exit mobile version