अनैतिक संबधाला पतीचा विरोध : पत्नीने केली पोटच्या मुलीची हत्या

अनैतिक संबधाला पतीचा विरोध : पत्नीने केली पोटच्या मुलीची हत्या

प्रातिनीधीक फोटो

डोंबिवली : संबधाला पतीने विरोध केल्यानंतर निर्दयी आईने पोटच्या एक वर्षाच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केल्याची ह्दयद्रावक घटना डोंबिवलीत घडली आहे. पूजा प्रसाद वय २८ असे त्या निर्दयी आईचे नाव असून मानपाडा पोलिसांनी तिला अटक केली आहे. प्रसाद कुटूंब हे मुळचे उत्तरप्रदेशचे रहिवासी आहेत.

डोंबिवली पूर्वेतील भोपर येथील विठाबाई चाळीत ननकण प्रसाद राहतात. त्यांना एक वर्षाची आरती नामक मुलगी होती. पत्नीचे अनैतिक संबध असल्याची कुणकुण ननकण यांना लागली होती. या कारणांवरून दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असत. ननकणने पत्नीच्या अनैतिक संबधाला विरोध केला होता. बुधवारी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते.

या रागातून पूजाने संतापाच्या भरात आपल्या पोटच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. हा प्रकार दुपारी अडीचच्या सुमारास घडला. हे कृत्य कोणालाही कळू नये म्हणून तिने चिमुकलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह गावातील गवतात फेकून दिला. ननकन घरी आल्यानंतर त्याला आरती घरात दिसली नाही. त्याने आरतीबद्दल पुजाकडे विचारणा केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकाराचा ननकला संशय आला. त्याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर चिमुकलीच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला. मानपाडा पोलिसांनी निर्दयी आईला बेडया ठोकल्या आहेत.

First Published on: September 28, 2018 1:48 AM
Exit mobile version