मराठा आरक्षणावर मला बोलायचं नाही – अमृता फडणवीस

मराठा आरक्षणावर मला बोलायचं नाही – अमृता फडणवीस

मराठा आरक्षणावर मला बोलायचं नाही- अमृता फडणवीस

‘मुख्यमंत्री यांच्याकडे निर्णयक्षमता आहे, ते निर्णय घेऊ शकतात आणि ते नक्कीच मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेतील’ असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. शेतकरी आठवडा बाजारच्या  २५ वा आठवडापूर्तीनिमित्त अमृता फडणवीस यांनी मुंबईतील नेपियनसी रोड वरील आठवडी बाजाराला भेट दिली. आठवडी बाजारात महाराष्ट्रतील ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला या शेतकरी आठवडी बाजार चा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि नागिरकाना देखील येथे  स्वस्त दरात भाजीपाला, फळ मिळणार आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात काय म्हणाल्या? 

अन्नदात्याला स्वयंभू करायचं असेल तर इथे थांबून चालणार नाही असं त्या म्हणाल्या. मराठा आरक्षण संदर्भात माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता मराठा आरक्षावर बोलण्यासाठी मी सक्षम नाही. एकीकडे न्यायालय आहे आणि दुसरीकडे  सरकार आहे. सध्या सरकारसमोर अनेक संकटं आहेत.  मराठा आरक्षणाविषयी घरात चर्चा होते. पण देवेंद्र मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे. ते योग्य निर्णय घेऊ शकतात. ते नक्कीच मराठा आरक्षण संदर्भात योग्य निर्णय घेतील, असा विश्वास यावेळी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

First Published on: August 5, 2018 12:21 PM
Exit mobile version