Mumbai Rain: मुंबईत आज, उद्या ‘येलो’ अलर्ट

Mumbai Rain: मुंबईत आज, उद्या ‘येलो’ अलर्ट

Monsoon 2021 : येत्या तीन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह बरसणार मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून उसंत घेतलेल्या पावसाने अखेर गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर शुक्रवारी मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. दिवसभर कोसळणाऱ्या संततधारेने वाहतुकीच्या वेगालाही ब्रेक लावला होता. तर आज, शनिवारीही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे आज, सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत पावसाची संततधार सुरु असून हवामान खात्याकडून ‘येलो’ अलर्ट देण्यात आला आहे. तर याउलट पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देत हवामान विभागाने अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

मुंबई शहरात शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५४.७८ मिमी, पूर्व उपनगरात ४३.५६ मिमी आणि पश्चिम उपनगरात २६.२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर संततधारेमुळे मुंबईच्या रस्त्यावरील दृष्यमान कमी झाले होते. त्यामुळे याचा परिणाम वाहतूकीवर देखील झाला होता. याशिवाय ठाणे आणि नवी मुंबईमध्येही ४० ते ७० मिमी पाऊस कोसळला होता. मुंबईसह ठाण्यात आज आणि उद्या मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच पुढील दोन दिवस मुंबईतील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

सर्वाधिक धरणं पाण्याने भरली

जुलै महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये राज्याला चांगलेच झोडपून काढले होते. त्यामुळे काही आठवड्यांआधी झालेल्या पावसाची सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे दिलासादायक बाब म्हणजे सर्वाधिक धरणं पाण्याने भरून गेली आहेत.


हेही वाचा – मुंबईतील पाणीकपात रद्द


 

First Published on: August 29, 2020 9:34 AM
Exit mobile version