गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास बंदी नाही; महापालिकेचे पत्रक जारी

गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास बंदी नाही; महापालिकेचे पत्रक जारी

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यंदाच्या वर्षी सर्वच सण हे कोरोनाच्या सावटाखाली साजरे होत आहेत. दरवर्षीसारखा उत्साह, उत्सव स्वरूप यंदाच्या सणांना दिसत नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याकरता सरकारने खालून दिलेल्या नियमावलीनुसार दहीहंडी, गणपती उत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील घरगुती, सार्वजनिक मंडळातील गणपती समुद्रात विसर्जित करू शकणार का, याबाबत अनेक भाविकांच्या मनात संभ्रम होता. त्यावर आता मुंबई महापालिकेने पत्रक जारी करून हा संभ्रम दूर केला आहे. त्यांनी या पत्रकात म्हटले आहे की, श्री गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास बंदी नाही. मात्र भाविकांनी पालिकेने बनवलेल्या १६ कृत्रिम तलावात गणपती विसर्जन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

समुद्र किनाऱ्यापासून १ ते २ किलोमीटरवर असलेल्यांना समुद्रात श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. ‘कोविड १९’ च्या अनुषंगाने नागरिकांच्या सेवेसाठी मुंबई महापालिकेतर्फे मुंबईत १६७ कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेली असून सामाजिक अंतर राखून कृत्रिम तलावात अधिक प्रमाणात गणेशाचे विसर्जन करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे. महापालिका प्रशासन आणि राज्‍य शासन यांनी वेळोवेळी केलेल्‍या सूचना/आवाहनाचे पालन करावे. त्याचबरोबर ‘कोविड १९’ च्या पार्श्वभूमीवर शारीरिक दुरीकरण, मास्‍क, सॅनिटायझर वापरुन हा उत्सव पार पाडावा, असे आवाहन पालिकेने वेळोवेळी करण्यात आलेले आहे.

येत्या २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून त्यानंतर दीड दिवसांचे, पाच दिवसांचे सात दिवसांचे व शेवटी ११ दिवसांचे गणपती विसर्जन केले जातात. मुंबई ही समुद्र किनाऱ्यांनी वेढलेली असल्यामुळे बहुतांश गणपती विसर्जन हे समुद्रात केले जाते. परंतू कोरोनाच्या संकटामुळे सरकार तसेच पालिकेने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यास सांगितले असून यंदा अनेकांनी त्याकरता सार्वजनिक गणेशोत्सवही रद्द केले आहेत.

हेही वाचा –

पार्थच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही – शरद पवार

First Published on: August 12, 2020 4:04 PM
Exit mobile version