ठाण्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू,पोलीस बंदोबस्तात वाढ!

ठाण्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू,पोलीस बंदोबस्तात वाढ!

पोलिसांचा बंदोबस्त

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणण्यासाठी ठाण्यात पुन्हा एकदा दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसानी बुधवारी रात्रीपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली मुंब्रा भिवंडी या मुख्य शहरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला असून प्रत्येक विभागात पोलीस गस्त घालणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली. गुरुवार पासून ठाणे, कल्याण डोंबिवली, मुंब्रा, उल्हासनगर, बदलापूर, भिवंडी अदी परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला असून विनाकारण फिरणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आलेले आहे.

मुंब्रा, भिवंडी,ठाणेशहर अदी शहरामध्ये बुधवार सकाळ पासूनच पोलिसानी विनाकारण  वाहन घेऊन रस्त्यावर फिरणारे तसेच दुचाकीवर डबलसीट फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली असून मुंब्रा पोलिसानी बुधवारी विनाकारण फिरणारे तसेच दुचाकीवर डबलसीट फिरणाऱ्या सुमारे दीडशे वाहनावर कारवाई केली असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. तसेच भिवंडीत १८८ वाहनांवर कारवाई करण्यात आलेली असून त्यात  १७१ दुचाकी,१५ तीनचाकी आणि २ चारचाकी वाहनांचा समावेश असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली. दरम्यान ठाणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाहनांवर कारवाई करण्यात आलेले आहेत.  लॉकडाऊन मध्ये नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर पडू नये असे आवाहन ठाणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.


हे ही वाचा – Video : Tiktok बंद झाल्याचे समजताच शाहरूख – काजोल ढसाढसा रडले!


 

First Published on: July 1, 2020 8:29 PM
Exit mobile version