‘मीरारोड’ ते ‘वसई’ आणि ‘डोंबिवली’ ते ‘तळोजा’ धावणार मेट्रो- देवेंद्र फडणवीस

‘मीरारोड’ ते ‘वसई’ आणि ‘डोंबिवली’ ते ‘तळोजा’ धावणार मेट्रो- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याण येथील भूमिपूजन सोहळ्यात

मुंबईचा विस्तार वाढल्यानंतर मराठी माणूस ठाणे, कल्याण, डोबिंबलीमध्ये विसावला. येथील लोकांना मुंबईशी जोडण्यासाठी आणखी दोन नव्या मेट्रोचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. मीरारोड ते वसई आणि डोंबिवली ते तळोजा अशी मेट्रो धावणार असून त्याला तातडीने मंजुरी दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण येथे सुरु असलेल्या मेट्रो ५ आणि ९ मार्गिकेच्या भुमिपूजन सोहळ्यात सांगितले. या भुमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत.

प्रवास होणार सुखकर

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अर्बन मोबिलिटी ही काळाची गरज बनली आहे. गेल्या ७० वर्षांमध्ये रेल्वेचं जेवढे नेटवर्क तयार झाले. त्याची क्षमता ७० लाख इतकी आहे. तर गेल्या ४ वर्षात सुरु झालेल्या नेटवर्कमुळे १ कोटी प्रवासी वाहन क्षमता पूर्ण होणार आहे. २ वर्षांपूर्वी मोदींच्या हस्ते ज्या मार्गिकेचे भूमिपूजन केले होते. त्याचे काम आता ६० टक्के पूर्ण झालेले आहेत. पुढील काळात हे जाळे आणखी वाढणार असून त्यांनी नव्या मार्गिकेची घोषणा देखील या कार्यक्रमात केली आहे. नव्या मार्गिकेमध्ये मीरारोड’ ते ‘वसई’ आणि ‘डोंबिवली’ ते ‘तळोजा’ यांचा समावेश आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. शिवाय येत्या ३ ते ४ वर्षात प्रवास हा अधिक सुखकर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

First Published on: December 18, 2018 4:10 PM
Exit mobile version