मुंबईत सुमारे ८०० प्रतिबंधित क्षेत्र, तर ४५०० इमारती केल्या सिल

मुंबईत सुमारे ८०० प्रतिबंधित क्षेत्र, तर ४५०० इमारती केल्या सिल

कोरोना बाधित रुग्ण आढळून येणाऱ्या परिसराला महापालिकेच्यावतीने बाधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले जात असून आतापर्यंत मुंबईत  ७९८ कंटेन्मेंट झोन आहे. यासर्व कंटेन्मेंट झोनमध्ये सुमारे १९ हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर संपूर्ण मुंबईत सध्या कोरोना रुग्ण आढळून आलेल्या साडेचार हजार इमारती सिल करण्यात आले आहेत. या सर्व इमारतींमध्ये एकूण सुमारे दहा हजार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. संपूर्ण मुंबईतील ४२ लाख १८ हजार ८१८ लोकसंख्या असलेल्या आणि ९ लाख ५० हजार ५७८ घरे असलेल्या ७९८ परिसरांना सिल करण्यात आले आहे. या बाधित क्षेत्रांमध्ये १८ हजार ९५७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

सर्वाधिक दहिसर या आर-उत्तर विभागात ११६ तर कुर्ला एल विभागात ११५ प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली आहे. तर सर्वाधिक कमी प्रतिबंधित क्षेत्र  ग्रँटरोड, मलबार हिल या डी विभागात आहेत. या विभागात ९ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. मात्र, जी-उत्तर व जी-दक्षिण विभागात अनुक्रमे १२ व ११ प्रतिबंधित क्षेत्र आहेत . या दोन्ही विभागांमध्ये कमी प्रतिबंधित क्षेत्र असली तरी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अनुक्रमे १४०० व  १०२१ एवढे कोरेाना पॉझिटिव्ह आढळले.

प्रतिबंधित करण्यात आलेल्या ४५३८ इमारतींमध्ये एकूण १ लाख ८० हजार १८७ घरे आहेत.  ८ लाख २ हजार ७३० लोकसंख्या असलेल्या यासर्व इमारतींमध्ये ९ हजार ९५६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. सर्वांधिक वडाळा,शीव अँटॉपहिल या एफ उत्तर विभागात ४४३ इमारती सिल करण्यात आली आहे. या इमारतींमधून ७१२ कोरेाना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर बोरीवलीच्या आर-मध्य विभागात ३७३ इमारती सिल केले. मालाड पी-उत्तर विभागात ३०६ इमारती आणि माहिम-धारावी व दादर या जी-उत्तर विभाग व विलेपार्ले व  जोगेश्वरी पूर्व या के-पूर्व विभागात प्रत्येकी २६५ इमारती सिल केलेल्या आहेत.

First Published on: June 10, 2020 10:01 PM
Exit mobile version