मुंबईत लवकरच इमारतींमध्ये जाऊन लसीकरण होणार; महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबईत लवकरच इमारतींमध्ये जाऊन लसीकरण होणार; महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती

अंधेरीतील बोगस लसीकरण प्रकरणाचा पर्दाफाश, एकाला अटक

मुंबईत लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र, लोकांना लसीकरणासाठी रांगेत ताटकाळत उभं रहावं लागत असल्यामुळे लवकरच मुंबई महानगरपालिका इमारतींमध्ये जाऊन लसीकरण करणार असून, त्याबाबत विचार सुरु असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. ज्यांच्या सोसायटीमध्ये लसीकरणाला अनुसरून जागा असेल तिथे लसीकरण केले जाईल, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. त्यामुळे लवकरच मुंबईत इमारतींमध्ये जाऊन लसीकरण होणार असल्याची शक्यता आहे.

मुंबईत इमारतींमध्ये जाऊन लसीकरण करण्यासाठी विचार करित आहोत. परंतु त्या इमारतींमध्ये जागा असली पाहिजे. कार्डियाक अॅम्ब्युलन्स असली पाहिजे. तिथे डॉक्टर्स उपलब्ध असले पाहिजेत, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. ज्या इमारती रस्त्याच्या कडेला आहेत. जिथे जागा नाही तिथे अशा पद्धतीने लसीकरण करता येणार नाही, असं महापौर म्हणाल्या.

चुकीचे संदेश देऊन जनतेची दिशाभूल

केंद्रातून येणाऱ्या लसी अपुऱ्या असल्याने त्याचा लसीकरणावर परिणाम होत आहे. त्याचा फायदा घेऊन अनेक लोक चुकीचे संदेश देऊन जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मोफत लसींप्रमाणेच मुबलक लसींसाठीही मागं लागायला हवं असं, महापौर म्हणाल्या.

आदित्य ठाकरेंनी पहिलं विलगीकरण केंद्र सुरु केलं

मुंबईत आदित्य ठाकरेंनी पहिलं विलगीकरण केंद्र सुरु केलं. मुंबई मनपाने जम्बो केअर सेंटर्स, फिल्ड हॉस्पिटल्सही सुरु केली. मुंबईच्या नियोजनाबद्दल आणि कारभाराबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही मुंबईच्या प्रशासनाचं कौतुक केलं आहे. मात्र, भाजपाला त्याचं काहीच नाही, असंही महापौर म्हणाल्या.

 

First Published on: May 6, 2021 1:05 PM
Exit mobile version