नायरमध्ये १९ जणांना कोव्हिशिल्ड लस

नायरमध्ये १९ जणांना कोव्हिशिल्ड लस

मुंबईतील केईएम व नायर रुग्णालयामध्ये कोव्हिशिल्ड लशीची चाचणी सुरू झाली आहे. आतापर्यंत नायर हॉस्पिटलमध्ये १९ जणांना ही लस देण्यात आली आहे. टप्प्याटप्याने ही लस १०० जणांना देण्यात येणार आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड लशीची चाचणी मुंबईतील केईएम व नायर रुग्णालयामध्ये करण्यात येत आहे. सोमवारी नायर रुग्णालयामध्ये या चाचणीला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी अवघ्या तीन जणांवर ही चाचणी करण्यात आली होती. आतापर्यंत १९ जणांना ही लस देण्यात आली आहे. नायर रुग्णालयामध्ये कोव्हिशिल्ड लशीची चाचणी १०० जणांवर करण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून स्वयंसेवकांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल १५० स्वयंसेवकांनी चाचणी करण्यासाठी नोंद केली आहे. यातील १०० जणांची आरटी-पीसीआर आणि अ‍ॅण्टिबॉडीज चाचणी करून त्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्वयंसेवकांची पुन्हा महिन्यांनतर या स्वयंसेवकांची तपासणी करून येणार्‍या निष्कर्षावरून पुढील प्रक्रिया निश्चित केले जाईल, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

First Published on: October 1, 2020 2:40 PM
Exit mobile version