इंडिया पोस्ट पोस्ट पेमेंट्स बॅंकेने गाठले ३.६ कोटी ग्राहक

इंडिया पोस्ट पोस्ट पेमेंट्स बॅंकेने गाठले ३.६ कोटी ग्राहक

इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेने (आयपीपीबी) 3.6 कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडल्याचे आज जाहीर केले. बँकेने १५ सप्टेंबर, 2020 पर्यंत एकूण ३८५०० कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहारसुद्धा पूर्ण केले आहेत. अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीतच आयपीपीबीने हे लक्ष्य गाठले आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बँकेने 1 कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला होता. १ सप्टेंबर, २०१९ ते १५ सप्टेंबर २०२० दरम्यान आयपीपीबीने एकूण आर्थिक व्यवहारांची संख्या १२.५ कोटी इतकी गाठली असून रक्कम सुमारे ३३,६०० कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. जवळपास अडीच टक्क्यांची वाढ नोंदवत २.५ कोटी नवीन ग्राहक जोडले गेले आहेत. गेल्या वर्षीच्या 303 कोटी रुपयांच्या ठेवी पाच पटीपेक्षा अधिकने वाढून 1,558 कोटी रु. वर ही रक्कम गेली आहे. तर 99% आयपीपीबी खाती आधार क्रमांकासह जोडली आहे. बिल पेमेंट व्यवहारांची संख्या आणि मूल्य पाच पट वाढून अनुक्रमे 1.21 कोटी आणि 230 कोटी रुपये झाले. तर एईपीएस व्यवहाराची संख्या आणि मूल्य अनुक्रमे २.८ कोटी आणि ६,१८२ कोटी रुपये आहे.

लॉकडाऊनमध्ये कुठे किती एईपीएस व्यवहार झाले ?

लॉकडाउन आणि अनलॉकच्या कालावधीत डिजिटल पेमेंट पद्धतीस जोरदार चालना देत आधार आधारित पेमेंट सर्व्हिसेस (एईपीएस) व्यवहारात लक्षणीय वाढ झाली आहे. या कालावधीत एकूण 5,362 कोटी रुपयांचे 2.52 कोटी व्यवहार बंकेद्वारे केले गेले आहेत. एईपीएस व्यवहाराच्या संख्येच्या बाबतीत, उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरात ही 3 सर्कल आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ६१.७ लाख, तर बिहार आणि गुजरातमध्ये अनुक्रमे २० लाख आणि १६.९ लाख व्यवहार झाले. एईपीएस व्यवहाराच्या रकमेनुसार उत्तर प्रदेश (११५१ कोटी रुपये), आंध्र प्रदेश (४९२ कोटी रुपये), आणि तेलंगणा (४६९ कोटी रुपये) हे तीन सर्कल अव्वल ठरले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत जोडलेल्या नवीन ग्राहकांची संख्या १.२२ कोटी आहे. ग्राहक वाढीच्या बाबतीत अव्वल 3 सर्कल अनुक्रमे बिहार (३६ लाख), उत्तर प्रदेश (२०.४ लाख), तामिळनाडू (१०.८ लाख) ही आहेत.


 

First Published on: October 1, 2020 6:57 PM
Exit mobile version