India vs Australia Indore Test : भारतीय संघाला झटपट विकेट घेण्याची आवश्यकता

India vs Australia Indore Test : भारतीय संघाला झटपट विकेट घेण्याची आवश्यकता

मुंबई : बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी गुडघे टेकण्यास मजबूर केल्यामुळे भारतीय संघाचा पहिला डाव 33.2 षटकात 109 धावांवर संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवसअखेर ४७ धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात टिकून राहण्यासाठी झटपट विकेट काढण्याची आवश्यकता आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर तिसरा सामना जिंकण्य्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय खेळाडूंचा उत्साह फार काळ टीकला नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसऱ्या सामन्याला इंदौर येथे सुरुवात झाली आणि ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी आपल्या फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाजांना अशाप्रकारे फसवले की त्यांना काय करू आणि काय करू नये हेच समजत नव्हते. त्यामुळे भारतीय संघाचा पहिला डाव १०९ धावांवरच संपुष्टात आला.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात ५२ चेंडूंत सर्वाधिक २२ धावा केल्या. याशिवाय खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलच्या जागी संधी मिळालेल्या शुभमन गिलने २१ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडाही पार करता आला नाही.

ऑस्ट्रेलियाकडून डावखुरा फिरकी गोलंदाज मैथ्यू कुहनेमैन याने आपल्या वैयक्तिक दुसऱ्याच कसोटी सामन्यात फक्त १६ धावा देत सर्वाधिक ५ विकेट घेण्याची किमया केली. याशिवाय अनुभवी नाथन लियोन याने 35 धावा देत 3 विकेट आणि टॉड मर्फीला १ विकेट मिळाली.

यानंतर ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेडच्या पहिली विकेट गमावली. ट्रॅव्हिस हेड फक्त ९ धावा करून बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या उसमाना ख्वाजाने मार्नस लॅबुशेनच्या सोबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागिदारी केली. उसमान ख्वाजा (६०), तर मार्नस लॅबुशेन (३१) धावा करून बाद झाला. याशिवाय कर्णधार स्टीव स्मिथने ३८ चेंडूंत २६ धावा केल्या. पहिला दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलिया संघाने ४ विकेट गमावून १५६ धावा केल्या आणि ४७ धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून पीटर हैंड्सकॉम्ब (7) आणि कैमरन ग्रीन (6) धावा करून मैदानावर आहे.

जडेजाची उत्तम गोलंदाजी
बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाने पुन्हा एकदा उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने २४ षटकात ६ निर्धाव षटके टाकताना ६३ धावा देत पहिल्या ४ विकेट घेतल्या.

First Published on: March 2, 2023 8:01 AM
Exit mobile version