स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठरली मानवंदना

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठरली मानवंदना

वायुसेनेने कामगिरी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठरली मानवंदना

पुलवामा दहशतवादी हल्ला १४ फेब्रुवारी झाला. या हल्लाला भारतीय वायुसेनेने मंगळवारी सकाळी या प्रतिउत्तर दिले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय वायुसेनेने जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे २०० दहशतवादी ठार केले आहेत. या वायुसेनेच्या कामगिरीला देशभरातून कौतुकाची थाप मिळत आहे. आज २६ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. ‘या स्वातंत्र्यवीरांना आजवर अशी मानवंदना देण्यात आली नव्हती ती मानवंदना वायुसेनेने आज दिली आहे’, अशी प्रतिक्रिया अभिनेते योगेश सोमण यांनी दिली. सोमण यांनी ही प्रतिक्रिया त्यांच्या फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि अभिनेता शरद पोंक्षे यांनीही वायुसेनेच्या कामगिरीबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पुण्यातील पोलिसांनी काही तरी शिका

अभिनेते योगेश सोमण यांनी एक फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट केली आहे. त्यामध्ये सोमन यांनी असे म्हटलं आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि वायुसेनेनी केलेली कामगिरी ही स्वातंत्र्यवीरांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची मानवंदना दिली गेली आहे. तसेच त्यांनी पुण्यामध्ये कर्णबधिर तरूणांवर झालेल्या लाठीचार्जचा उल्लेखसुद्धा केला आहे. पुण्यातील पोलिसांनी यामधून काहीतरी शिकावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

लष्करांना सर्वाधिकार दिले 

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही वायुसेनेने उत्तम कामगिरी केल्याचे म्हणत कौतुक केले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सेनेला सर्वाधिकार सैन्याला दिले होते. असे अधिकार देणारे पंतप्रधान नरेंद्रे मोदीच आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. ६२ वर्षामध्ये कोणत्याही पंतप्रधानाने असे संपूर्ण अधिकार लष्कारांना दिले नव्हते. तर फक्त दहशतवाद्यांना उधवस्त केल इतरांना कोणालाही दुखापत केली नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय वायुसेनेने केलेल्या कामगिरीनंतरसमोर आली आहे.

स्वातंत्र्यवीरांना मानवंदना ठरली

अभिनेते शरद पोंक्षे यांनीही वायुसेनेच्या कामगिरीबद्दल सांगताना म्हटले की, आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि आजच वायुसेनेने ही कामगिरी केली आहे. ही कामगिरी स्वातंत्र्यवीरांना मानवंदना ठरली आहे.

First Published on: February 26, 2019 8:07 PM
Exit mobile version