रेल्वेमध्ये ९,५०० कॉन्स्टेबलची भरती, १ जूनपासून करा अर्ज

रेल्वेमध्ये ९,५०० कॉन्स्टेबलची भरती, १ जूनपासून करा अर्ज

रेल्वे भरती 2018

भारतीय रेल्वेने रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे सुरक्षा विशेष दल (आरपीएसएफ) यामध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. जवळपास ९ हजार ५०० जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदाचा देखील समावेश आहे.

काय आहे पात्रता निकष?

१ जून २०१८ ला सकाळी १० वाजल्यापासू अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. तर ३० जूनला अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. ऑनलाईनद्वारे हे अर्ज भरता येणार आहेत. उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २५ ठेवण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतून १२ वी पास असलेले विद्यार्थी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरु शकतात. अर्ज पाठवलेल्या उमेदवारांची पहिल्या टप्प्यात लेखी परिक्षा घेतली जाईल. या परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांची शारिरीक चाचणीही घेतली जाणार आहे.

महिलांसाठी ५०% जागा आरक्षित

या भरतीसंदर्भातील भारतीय रेल्वे बोर्डाच्या वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे. मात्र, अर्ज भरण्याची प्रक्रिया ही १ जून २०१८ पासूनच सुरू होणार आहे. ९ हजार ५०० जागांसाठी ही भरती होणार असून यातील ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पास झालेल्या उमेदवारांना ग्रेड पे २००० रुपयांसोबत महिन्याला ५,२०० ते २०,२०० रुपये वेतन देण्यात येणार आहे. त्यामुळे आता रेल्वे भरतीची वाट पहाणाऱ्यांसाठी ही खूश खबरच आहे.

इथे करा अर्ज

http://www.indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,1,304,366,533,2015

First Published on: May 19, 2018 5:14 AM
Exit mobile version