इंद्राणी मुखर्जी पुन्हा जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल

इंद्राणी मुखर्जी पुन्हा जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल

शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला प्रकृती अस्वस्थतेमुळे सोमवारी, सायंकाळी उशिरा जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती जे. जे. हॉस्पिटलची वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितले. तसंच, त्यांच्या तपासण्या सुरु असल्याचेही डॉ. सुरासे म्हणाले. इंद्राणी मुखर्जीला अचानक डोके दुखी होऊ लागल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याशिवाय एकच वस्तू दोनदा दिसत असल्याचेही तिने डॉक्टरांना सांगितले.

तपासणी पूर्ण झाल्यावर डिस्चार्जचा निर्णय घेणार 

दरम्यान, सध्या इंद्राणीची प्रकृती अस्वस्थ आहे. मुखर्जीला आधीपासूनच हायपरटेंशन आणि स्पॉन्डिलायसीसचा त्रास आहे. तरीही तिच्या तपासण्या जे. जे. हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांकडून सुरु असल्याचे जे. जे. हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले‌ आहे. तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज द्यायचा की नाही ते ठरवलं जाणार आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी मध्यरात्री मुखर्जीला जे. जे. मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र अद्याप तिच्या आरोग्य तपासण्या सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात इंद्राणी मुखर्जी ग्लानीत गेल्याने तिला रुग्णालयात तपासण्यांसाठी आणले होते. त्यावेळी, रक्तदाबाचा त्रास असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसंच, मुखर्जी यांचे एक्स-रे आणि एच. आर. सीटी करण्यात आले होते. तसेच फुफ्फुसाच्या उजव्या बाजूला न्यूमोनियाचा पॅच दिसत होता, असेही सांगण्यात आले होते.

शीना बोराच्या हत्येतील मुख्य आरोपी 

इंद्राणी मुखर्जीही कार्ती चिंदमबरम यांच्या विरोधातील आयएनएक्स मीडिया प्रकरणातील सीबीआयची मुख्य साक्षीदार आहे. यापूर्वी कार्ती आणि इंद्राणीला एकमेकांसमोर बसवून चौकशी करण्यात आली होती. आयएनएक्स मीडियाच्या माजी सहसंस्थापक मुखर्जी यांच्यावर त्यांची मुलगी शीना बोराच्या हत्येचा आरोप आहे. या प्रकरणात इंद्राणी ही मुख्य आरोपी आहे. २०१२ साली इंद्राणीने शीनाची हत्या केली होती.

First Published on: September 25, 2018 11:25 AM
Exit mobile version