Video: कल्याणमध्ये सापडले जिवंत अर्भक; पोलिसांनी दिले बाळाला जीवनदान

Video: कल्याणमध्ये सापडले जिवंत अर्भक; पोलिसांनी दिले बाळाला जीवनदान

कल्याण शीळ रोडवरील पुलाखाली नुकतेच जन्मलेले जिवंत अर्भक सापडले

कल्याण शीळ रोडवरील पुलाखाली नुकतेच जन्मलेले जिवंत अर्भक सापडले आहे. स्त्री जातीचे असलेले अर्भकाला शीळ डायघर पोलिसांनी ताब्यात घेऊन नजिकच असलेल्या खासगी रुग्णलयात दाखल केले करण्यात आले आहे. याप्रकरणी शीळ डायघर पोलिसांनी अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण शीळ रोड वरील देसाई नाका येथून काही अंतरावर असलेल्या खाडी पुलाखाली शनिवारी दुपारी लहान मुलाचा रडण्याचा आवाज पुलावरून जाणाऱ्या काहींना ऐकू आला. त्यांनी पुलाखाली बघितले असता खाडीजवळ पुलाच्या खाली कपड्यात लपेटलेले लहान मूल दिसून आले. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना कळवले. शीळ डायघर तसेच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अर्भक जिवंत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी ताबडतोब ते ताब्यात घेऊन नजीकच असलेल्या जीवदानी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी स्त्री जातीचे नुकतेच जन्मलेल्या या मुलाला तपासले असता ते ठणठणीत असल्याचे पोलिसांना सांगितले.

 

दरम्यान डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून ते पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बाळाची नोंद करून तसेच त्यांची पूर्ण तपासणी करून नवी मुंबईतील विश्वभारत केंद्र येथे या नवजात अर्भकाला ठेवण्यात आले असल्याची माहिती डायघर पोलिक ठाण्याचे पोउनी सागर शिंदे यांनी दिली. याप्रकरणी अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

First Published on: July 19, 2020 7:12 PM
Exit mobile version