ठाण्यात आढळला जखमी कासव

ठाण्यात आढळला जखमी कासव

ठाण्यात आढळला जखमी कासव

ठाणे महापालिकेजवळील पाचपाखाडी येथील कचराळी तलावामध्ये सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास एक कासव जखमी आढळूने आले. या कासवाला ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने ब्रम्हांड येथील प्राण्यांच्या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. उपचारानंतर त्या कासवाला तलावात सोडण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

उपचारानंतर तलावात सोडणार

कचराळी तलावात असलेले हे मादी जातीचे कासव ३९ किलो वजनाचे होते. या कासवाच्या पोटाच्या भागाला जखम झाली होती. सदर कासव कचराळी तलावाच्या किनाऱ्यावर आलेले असताना जॉगिंगसाठी येणाऱ्या दक्ष नागरिकाला हे जखमी कासव दिसले. त्याने त्वरित ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यव्यस्थापन पथकाला माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापनाने त्वरित कासवाला ब्रह्मांड येथील प्राण्यांच्या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी पाठविले. कासवावर दोन ते तीन दिवस उपचार केल्यानंतर कचराळी तलावात सोडून देण्यात येणार आहे.

First Published on: July 29, 2019 8:06 PM
Exit mobile version