नवी मुंबईच्या सीवूड्स स्थानकांत रस्त्यांवर अळ्या; नागरिक त्रस्त

नवी मुंबईच्या सीवूड्स स्थानकांत रस्त्यांवर अळ्या; नागरिक त्रस्त

नवी मुंबईत सीवूड्स रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावरुन प्रवास करणारे नागरिक सध्या किड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. रस्ते, सोसायटीची भिंत आणि झाडांवर बरेच किडे साचले आहेत. हे किडे अंगावर पडल्याने अंगाला खाज आणि लाल डाग पडत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.

सीवूड्स रेल्वे स्थानकातून सेक्टर नवीन ५० च्या दिशेने नवी मुंबई महानगर पालिकेकडे जाणाऱ्या रोडवर या किड्यांचा गेली दोन दिवस सुळसुळाट झाला आहे. हे किडे अंगावर पडल्याने नागरिकांच्या शरीराला खाज येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ऊन आणि पाऊस असे वातावरण असल्यामुळे या बदललेल्या वातावरणामुळे सीवुड्स परिसरात किडे आढळत असल्याचे बोले जात आहे. तसेच झाडाला लागून असलेले हे किडे रस्त्यावरुन चालणाऱ्या लोकांना त्रासदायक ठरत आहेत. याप्रकरणी परिसरातील लोकांनी, तसेच लोकप्रतिनिधींनी महानगर पालिकेकडे याबाबत तक्रारही केली आहे. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी करत अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारत ते किडे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

First Published on: October 10, 2019 5:11 PM
Exit mobile version